शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्या ट्रेलरचालकाचा थरार

By admin | Updated: March 29, 2015 02:26 IST

दारुड्या ट्रेलरचालकाने, पोलिसांपासून वाचण्यासाठी सीए रोडवर चांगलाच थरार घडविला.

नागपूर : दारुड्या ट्रेलरचालकाने, पोलिसांपासून वाचण्यासाठी सीए रोडवर चांगलाच थरार घडविला. अनियंत्रित ट्रेलर डिप्टी सिग्नलजवळील एका गॅरेजमध्ये घुसल्याने चार वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र अनियंत्रित ट्रेलरचालकाच्या कृत्यामुळे परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली होती. शुक्रवारी मध्यरात्री हिंगणा येथून एचआर-३८-७८७४ या क्रमांकाचा ट्रेलर लोखंड घेऊन उमरेडच्या दिशेने चालला होता. ट्रेलरचा चालक हिरालाल परते (२८) याने दारू ढोसल्याने, त्याचे ट्रकवरून नियंत्रण सुटले होते. ट्रेलर सीए रोडवरून जात असताना, पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाच्या हे लक्षात आले. त्यांनी ट्रेलरचा पाठलाग सुरू केला. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहनाचा वेग वाढविला. मिळेल त्या दिशेने तो सुसाट पळत होता. पेट्रोलिंग पथकाने कंट्रोलला सूचना दिल्याने, गणेशपेठ, लकडगंज ठाण्याचे पोलीस कामाला लागले होते. ट्रेलरचालक मिनीमातानगरच्या दिशेने निघाला. डिप्टीसिग्नल रेल्वे क्रॉसिंगजवळ त्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या पोलिसांची गाडी नजरेस पडली. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या खाली वाहन उतरविले. त्यामुळे दोन विजेच्या खांबाला धडक बसल्याने खांब कोसळून पडले, विजेच्या ताराही तुटल्या. येथे अमन आॅटोडिल व वर्कशॉप आणि रवी डिझेल नावाचे गॅरेज आहे. ट्रेलर थेट गॅरेजमध्येच शिरला. येथे उभ्या असलेल्या चार वाहनांचे चांगलेच नुकसान झाले. ट्रेलरचालक गाडी टाकून फरार झाला. पोलिसांनी त्याला मिनीमातानगरातून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध लकडगंज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी झाली होती. त्यामुळे कुठलीही गंभीर घटना घडली नाही. (प्रतिनिधी)