शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

ललित कला विभागात गुणांचाही ‘ड्रामा’

By admin | Updated: July 31, 2016 02:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागात दोन दिवस अगोदर प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा वाद पोलिसांपर्यंत गेला होता.

प्रात्यक्षिक गुणांची झाली अदलाबदल : प्राध्यापिकेची कबुली नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागात दोन दिवस अगोदर प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा वाद पोलिसांपर्यंत गेला होता. आता या विभागात चक्क गुणांचादेखील ‘ड्रामा’च झाल्याची बाब समोर आली आहे. विभागात विद्यार्थिनींच्या प्रात्यक्षिक गुणांची अदलाबदल झाली असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हे गुण देणाऱ्या प्राध्यापिकेनेच ही बाब कबूल केली आहे. ललित कला विभागातील ‘एमएफए’च्या प्रथम वर्षातील नृत्य-कथ्थक विषयाच्या विद्यापीठ प्रात्यक्षिकासाठी दोन विद्यार्थिनी बसल्या होत्या. या विद्यार्थिनींची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची जबाबदारी डॉ. संयुक्ता थोरात यांच्याकडे होती. प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर ते गुण विद्यापीठाला पाठविण्यात येतात. परंतु हे गुण पाठविताना डॉ. थोरात यांच्याकडून गुणांची अदलाबदल झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर ही बाब समोर आली. तेव्हा परीक्षा नियंत्रकांना २५ मे रोजी पत्र पाठवून या गुणांची अदलाबदल झाली आहे, असे कळविले व गुण बदलण्यात यावे, अशी विनंती केली. डॉ. थोरात यांच्यावर विभागातीलच एक विद्यार्थिनी प्रियंका ठाकूर हिने ‘ड्रामा’ विषयांच्या अंतर्गत मूल्यमापनात जाणूनबुजून कमी गुण दिल्याचा आरोप केला होता व हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले होते. विद्यार्थिनींच्या नुकसानाला जबाबदार कोण ? प्रात्यक्षिक गुणांच्या अदलाबदलीमुळे विद्यार्थिनींचे नुकसान झाले आहे. आता त्यांचा निकाल बदलविणेदेखील शक्य नाही. अशा स्थितीत या नुकसानाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.