शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

डाॅ. आंबेडकर चाैक मेट्राे स्टेशनचे ८० टक्के कार्य पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:08 IST

नागपूर : नागपूर मेट्राे रेल्वे प्रकल्पाच्या रिच-१ म्हणजे वर्धा राेड आणि रिच-३ म्हणजे हिंगणा राेडवरील ऑरेंज आणि ॲक्वा लाईनवर ...

नागपूर : नागपूर मेट्राे रेल्वे प्रकल्पाच्या रिच-१ म्हणजे वर्धा राेड आणि रिच-३ म्हणजे हिंगणा राेडवरील ऑरेंज आणि ॲक्वा लाईनवर रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर शहरवासीयांना उर्वरित दाेन लाईनवरील सेवेची प्रतीक्षा आहे. या दाेन्ही काॅरिडाेरचे कामही वेगाने हाेत आहे. मेट्राे पुलांसह उरलेल्या स्टेशनच्या इमारतींचे काम पूर्णत्वास येत आहे. याअंतर्गत रिच-४ म्हणजे सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर निर्माणाधीन डाॅ. आंबेडकर चाैक मेट्राे स्टेशनचे बांधकामही ८० टक्के पूर्ण झाले आहे.

सीए राेडच्या मध्यात असलेले डाॅ. आंबेडकर चाैक मेट्राे स्टेशन वर्दळीच्या ठिकाणी असल्याने नागरिकांना याचा लाभ अधिक हाेण्याची अपेक्षा आहे. स्टेशन परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट परिवहन सेवा मिळणार आहे. स्टेशनच्या जवळच्या परिसरात अनेक सरकारी, निमसरकारी कार्यालये, मंदिर, सभागृह, बँका असल्यानेही मेट्राे सेवा सुरू हाेताच नागरिकांना फायदा मिळेल आणि हे स्टेशन प्रमुख स्टेशन म्हणून ओळखले जाईल.

डाॅ. आंबेडकर चाैक मेट्राे स्टेशनचे बांधकाम १७८७ वर्गमीटरमध्ये विस्तारलेले आहे. लांबी ८१.२५ मीटर तर रुंदी २२ मीटर आहे. स्टेशनच्या दाेन्ही बाजूंना प्रवेश आणि निकासीची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्राऊंड लेव्हल, काॅनकाेर्स लेव्हल आणि प्लॅटफार्म असे तीन माळे आहेत. दुसऱ्या माळ्यावरील काॅनकाेर्स लेव्हलवर तिकीट काऊंटर व कंट्रोल रुम असेल. काॅनकाेर्स लेव्हलवर फ्लाेरिंग लिफ्ट शाफ्ट, एससीआर, टाॅम, एस्केलेटर ही कार्यालये असतील. स्टेशनवर दाेन लिफ्ट, दाेन एस्केलेटर तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वाॅटर हार्वेस्टिंग व बायाे-डायजेस्टरचीही व्यवस्था करण्यात येत आहे.