शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

डीपीसी आता ४०० कोटींची

By admin | Updated: March 12, 2017 02:32 IST

राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून नागपूरसाठी चांगले दिवस आले आहेत. एकूण नागपूर शहरात विविध विकास कामे सुरूआहेत.

विकास आराखड्याला मंजुरी : मागील वर्षीपेक्षा ५० कोटी अधिक आनंद डेकाटे  नागपूर राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून नागपूरसाठी चांगले दिवस आले आहेत. एकूण नागपूर शहरात विविध विकास कामे सुरूआहेत. आता जिल्हा नियोजन समितीला मिळणाऱ्या निधीत सुद्धा सातत्याने वाढ होत आहे. नागपूरची जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) आता ४०० कोटीवर पोहोचली आहे. राज्य सरकारने नुकतेच जिल्ह्यातील विकास नियोजनाच्या आराखड्यास मंजुरी प्रदान केली आहे. \ नागपूर जिल्हा नियोजन समितीमध्ये मागील तीन वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. तीन वर्षांपूर्वी २५० कोटी रुपयांच्या विकास कामांचे नियोजन करणारी डीपीसी ३०० कोटीवर पोहोचली. नंतर ३५० कोटींवर आणि आता ती ४०० कोटींवर पोहोचली आहे. गेल्यावर्षी ३५० कोटींचा जिल्हा नियोजन समितीने विकास आराखडा तयार केला होता. शासनाने निधी उपलब्ध केला. तो खर्च सुद्धा झाला. अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या एक दिवसापूर्वी राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात नागपूर विभाग आणि अमरावती विभागातील २०१७-१८ या वर्षासाठीच्या जिल्हा विकास आराखड्याचा आढावा घेतला होता. त्यावेळी नागपूर जिल्ह्यातर्फे ५९८ कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला होता. त्यावर सविस्तर चर्चाही झाली होती. राज्य शासनाने यापैकी ४०० कोटी ८ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी प्रदान केली आहे. जिल्हा नियोजन विभागाला याबाबत मंजुरीचे पत्रही प्राप्त झाले आहे. त्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जिल्हा नियोजन विकास आराखड्यात ५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आमदारांचा निधी १०० टक्के खर्च प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी सुद्धा विकास कामे करवून घेण्यात मागे नाहीत. त्यांना मिळणाऱ्या निधीचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील आमदारांना मिळणारा प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी सुद्धा १०० टक्के खर्च झाला आहे. मुद्रा योजना, सिंचन व रोजगार निर्मितीवर भर अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेताना जिल्हा आराखडा हा रोजगार निर्मितीवर भर देणारा तयार करण्यात यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे जिल्हा विकास आराखडा मंजूर करतांना हे निकष आवर्जून तपासण्यात आले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे यंदाचा वाढीव निधी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने खर्च होणार आहे. यासाठी मुद्रा योजना, कृषी व सिंचन, रस्ते याचाही विचार करण्यात आलेला आहे.