शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार नागपूरकरांना कोव्हॅक्सिनचा डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:17 IST

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जात असताना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचा तिसरा टप्पा नागपुरात सुरू झाला आहे. ...

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला जात असताना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचा तिसरा टप्पा नागपुरात सुरू झाला आहे. यासाठी हजार स्वयंसेवकांची निवड प्रक्रिया सुरू असताना यातील २५० स्वयंसेवकांना ही लस देण्यातही आली आहे. विशेष म्हणजे, यात पाच टक्के डॉक्टरांचा समावेश आहे. शिवाय, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड व यकृताचा आजार असलेल्या; परंतु मागील तीन महिन्यांपासून तो नियंत्रणात असलेल्या रुग्णांनाही ही लस दिली जात आहे.

भारत बायोटेकच्या ‘कोेव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचणीला राज्यात नागपूरच्या गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ५५, तर दुसऱ्या टप्प्यात ५० स्वयंसेवकांना ही कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. सर्वांची प्रकृती उत्तम असल्याने आता तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. भारतात २४ हॉस्पिटलमधून २५,५०० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. या टप्प्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयांना वगळण्यात आले आहे. राज्यात मुंबईच्या सायन हॉस्पिटल व नागपुरातील सीए रोडवरील रहाटे हॉस्पिटलकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे.

‘कोव्हॅक्सिन’ नागपूरचे रिसर्च हेड डॉ. आशिष ताजणे यांनी सांगितले, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात नोंद होऊनही ज्यांना ही लस मिळाली नाही अशा बहुसंख्य स्वयंसेवकांनी तिसऱ्या टप्प्यातील लसीसाठी पुढाकार घेतला आहे. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. ही लस १८ वर्षांपासून ते ६५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना दिली जात आहे.