शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १८ लाखांवर नागरिकांना डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरात पहिला आणि दुसरा डोज मिळून एकूण १८२६०५२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरात पहिला आणि दुसरा डोज मिळून एकूण १८२६०५२ डोस देण्यात आले आहेत. १३ सप्टेंबरपर्यंत शहरातील १२,७४,९३७ नागरिकांनी पहिला तर ५,५१,११५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

मनपासह शासकीय व खासगी केंद्रांमधून लसीचे डोस देण्यात आले आहेत. कोरोनाचा संक्रमण रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. शहरातील १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला लस मिळावी. यासाठी मनपाद्वारे विविध उपक्रमही राबविले जात आहे.

लसीकरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मनपाची आरोग्य चमू झोपडपट्टी भागांमध्ये जाऊन नागरिकांचे त्यांच्या घरी लसीकरण करीत आहे.

नागपुरात टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू करण्यात आले. प्रथम चरणात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर, दुसऱ्या चरणात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील गंभीर आजार असणारे, तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील सर्व व्यक्ती, चौथ्या टप्प्यात ३० वर्षावरील सर्व व्यक्ती तर पाचव्या टप्प्यात १८ वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले.

प्रारंभी शहरात फक्त चार केंद्रावर लसीकरण सुरू होते. आज १६० पेक्षा अधिक केंद्र आहेत.. गर्दीर्चे योग्य नियोजन आणि व्यापक जनजागृतीमुळे नागपूर शहराने लसीकरणाच्या पहिला डोसचा १० लाखांचा टप्पा ५ ऑगस्ट रोजी पार केला. तर आज दोन्ही डोसचा आकडा १८ लाखांच्यावर पोहोचला आहे. योग्य नियोजनामुळे नागपुरातील लसीकरण उद्दिष्टपूर्तीकडे जात असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

.....

विविध गटातील लसीकरण

आरोग्य कर्मचारी- ७५४९६

फ्रंट लाईन वर्कर -९२३१२

१८ ते ४४ वर्ष वयोगट-७११६७९

४५ ते ६० वर्ष वयोगट- ४४३१३८

४५ ते ६० वर्ष वयोगट(आजार[)- १३१५६२

६० वर्षावरील -३७१८६५

एकूण -१८२६०५२ (पहिला व दुसरा डोस )

...