शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्या शोषणाचे मुक्तिद्वार उघडायचेच आहे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

निशांत वानखेडे नागपूर : सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या परिश्रमाच्या पुण्याईने लोकसंख्येचा अर्धा हिस्सा असलेल्या देशातील तमाम महिला वर्गाला ...

निशांत वानखेडे

नागपूर : सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या परिश्रमाच्या पुण्याईने लोकसंख्येचा अर्धा हिस्सा असलेल्या देशातील तमाम महिला वर्गाला शिक्षणाच्या मार्गाने विस्तीर्ण आणि मोकळे आकाश मिळाले. कुठल्याही क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिला पाहताना याचा विश्वास वाटतो. मात्र अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. विशेषत: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची स्थिती आजही विदारक आहे. केवळ नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास जवळपास १० लाख महिला या क्षेत्रात काम करतात. त्यांना सामाजिक, आर्थिक आणि कामाचीही सुरक्षा नाही. कोरोना काळात यातील ९० टक्के महिलांनी त्यांचे रोजगारही गमावले. अनेक प्रश्नांबाबत या महिला संघर्ष करीत आहेत. त्यांच्या शोषणाचे मुक्तिद्वार अद्याप उघडायचे आहे.

विदर्भ माेलकरीण संघटनेच्या अध्यक्ष व विचारवंत डाॅ. रूपाताई कुळकर्णी-बाेधी यांनी त्यांच्या टीमसह शहरात घरकामगार महिलांसह इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार महिलांचे सर्वेक्षण करून त्यांच्या स्थितीची सत्यता मांडली.

काेणकाेणत्या कामात सहभाग

घरकामगार महिला, बांधकाम कामगार, काॅटन मार्केटमधील कुली, कचरा वेचणाऱ्या महिला, विटभट्ट्यांवरील कामगार, अगरबत्ती कारखान्यातील कामगार, सभागृह व कॅटरिंग क्षेत्र, फूटपाथवर भाजी विक्री व इतर व्यवसाय करणाऱ्या महिला, पापड बनविणाऱ्या महिला, लग्नाच्या वरातीत डाेक्यावर ट्यूबलाईट वाहणाऱ्या महिला, स्थलांतरित मजूर आदी असंघटित क्षेत्रात महिला काम करतात.

शिक्षणाचा अभाव

कचरा वेचणाऱ्या ८० टक्के व काॅटन मार्केटमध्ये कुली काम करणाऱ्या ७० टक्के महिला अशिक्षित आहेत. अशिक्षितपणाचे इतर क्षेत्रातील प्रमाण विचारात घेता, लग्न वरातीत लाईट वाहणाऱ्या ५० टक्के, बांधकाम क्षेत्रातील ४६ टक्के, सफाई काम करणाऱ्या २२ टक्के, अगरबत्ती व्यवसायातील १६ टक्के, फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्या ४० टक्के, कॅटरिंग क्षेत्रातील १८ टक्के, घरकाम करणाऱ्या २२ टक्के, विटभट्ट्यांवरील ३२ टक्के आणि ३८ टक्के स्थलांतरित मजूर महिला अशिक्षित आहेत.

काेराेना काळात ९० टक्क्यांनी गमावले राेजगार

काेराेना महामारीचा सर्वाधिक आघात या असंघटित क्षेत्रातील महिलांवर झाला. घरकामगार, कॅटरिंग, विटभट्ट्या, लग्न समारंभात काम करणाऱ्या ९० टक्के महिलांनी त्यांचे राेजगार गमावले. इतरही क्षेत्रात प्रमाण कमी-अधिक आहे. ९५ टक्के घरमालकांनी घरकाम करणाऱ्या महिलांना कामावरून काढले. अनेकांनी यंत्र खरेदी केले. त्यामुळे भविष्यातही त्यांना काम मिळेल की नाही, हा प्रश्न आहे. २ टक्क्याने त्यांना कामावर राहू दिले तर काही थाेड्यांनी संवेदना जपत पगारी रजा दिल्या.

घरकामगार बाेर्डाचे पुनर्गठन आवश्यक

डाॅ. रूपाताई यांनी सांगितले, प्रदीर्घ संघर्षानंतर २००८ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने घरकामगार महिलांसाठी मंडळाची स्थापना केली. त्यामुळे घरकामगारांच्या नाेंदणीची व्यवस्था झाली. वार्षिक पगारवाढीची तरतूद, प्रसूती काळात पगारी रजा व मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी जनश्री याेजना सुरू केली हाेती. मात्र २०१४ मध्ये नव्या सरकारने हे मंडळच बरखास्त केले. अनेक प्रश्न असताना बाेर्ड बरखास्त करणे अनाकलनीय असल्याची टीका त्यांनी केली. घरकामगारांना शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान वेतन लागू करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे.

आजच्या काळाशी सुसंगत बदल गरजेचा

जगात हाेणारा तांत्रिक बदल स्वीकारणे काळाची गरज झाली आहे. असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी सरकारने पावले उचलावीत. काैशल्य विकास केंद्रात प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. आराेग्य व सुरक्षा व्यवस्थेसाठी उपाय याेजावेत. माेबाईल, संगणकीय ज्ञानाशी जाेडावे.