शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचा संप मागे

By admin | Updated: August 24, 2014 01:10 IST

सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रु ग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून येथील निवासी डॉक्टर किरण जाधव याने पाच दिवसांपूर्वी आत्महत्या केली. याच्या निषेधात मेडिकल

मेडिकल, मेयो : रुग्णसेवा प्रभावितनागपूर : सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रु ग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून येथील निवासी डॉक्टर किरण जाधव याने पाच दिवसांपूर्वी आत्महत्या केली. याच्या निषेधात मेडिकल आणि मेयोच्या निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने शनिवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. या दोन्ही रुग्णालयातील सुमारे ४५० निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली होती.गर्दीने ओसंडून वाहणारे मेडिकल व मेयातील निवासी डॉक्टर अचानक शनिवारी सकाळपासून संपावर गेले. यामुळे गरीब रु ग्ण अडचणीत आला. जिथे सहा डॉक्टर विभाग सांभाळत होते तिथे एक किंवा दोन वरिष्ठ डॉक्टरांवर ही जबाबदारी देण्यात आली होती. यामुळे गंभीर आजाराच्या रुग्णांसोबतच सामान्य रुग्णांना याचा मोठा फटका बसला. निवासी डॉक्टर हा मेडिकल आणि मेयोचा कणा आहे. हा कणाच नसल्याने या दोन्ही रुग्णालयातील ७० टक्के रुग्णसेवा प्रभावित झाली होती. मेडिकल मॉर्डचे अध्यक्ष डॉ. आयुध मगदूत यांनी सांगितले, डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांना नेहमी येणाऱ्या अडचणी तीव्रपणे समोर आल्या आहेत. वेळोवेळी समस्या मांडूनही शासन याकडे लक्ष देत नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहेत.म्हणूनच हा एक दिवसाचा ‘कॉमन बंक’ आम्ही पुकारला. मार्डचे सचिव डॉ. नोव्हील ब्राम्हणकर म्हणाले, निवासी डॉक्टरांचे कामाचे तास, कमी असलेले मनुष्यबळ, थेसीसच्या नावाखाली दिला जाणारा त्रास या गोष्टींवर शासन उपाय करीत नाही. यामुळे डॉक्टरांमध्ये वैफल्य निर्माण होऊन असे प्रकार घडतात. शासनाने यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. दरम्यान सकाळी मेयोच्या मार्ड संघटनेचे सचिव डॉ. जितेश शेरकुरे व उपाध्यक्ष डॉ. कुंतल सुराणा यांच्या उपस्थितीत डॉ. जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येत निवासी डॉक्टर उपस्थित होते. (प्रतिनिधी)