शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांनी सामाजिक कर्तव्याचे भान ठेवावे

By admin | Updated: December 7, 2015 06:46 IST

आपला देश आरोग्याला घेऊन अडचणींना तोंड देत आहे. यामुळे प्रत्येक डॉक्टराने सामाजिक कर्तव्याचे भान

नागपूर : आपला देश आरोग्याला घेऊन अडचणींना तोंड देत आहे. यामुळे प्रत्येक डॉक्टराने सामाजिक कर्तव्याचे भान राखल्यास अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकेल. ग्रामीण भागात आजही तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. याकडे शासन लक्ष देत असले तरी डॉक्टरांनी स्वत:हून पुढाकार घेण्याची गरज आहे. नव-नवीन संशोधनाकडे डॉक्टरांनी लक्ष देऊन त्याचा लाभ तळागळातील लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.कोमहाड, सीएचपीए, अकॅडमी आॅफ पिडीयाट्रीक्स (नागपूर) युनिसेफ, वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस) यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांच्या अपंगत्वावर ‘कोमहाड -२०१५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी रामदासपेठ येथील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित या परिषदेच्या औपचारिक उद्घाटनाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी अस्थिव्यंग असलेल्या दोन मुलांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार डॉ. मिलिंद माने, ‘कोमहाड’ समितीचे अध्यक्ष व प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, प्रा. एमडीसीरजल इस्लाम, प्रा. राजाराम पगडाला, प्रा. सॅम लिंगम, परिषदेचे आयोजन सचिव डॉ. यशवंत पाटील, डॉ. सुचीत बागडे, डॉ. वसंत खळतकर, डॉ. आर.जे. पाटील, डॉ. गिरीश चरडे आदी उपस्थित होते.बडोले म्हणाले, समाजात आजही डॉक्टरांना ईश्वराचा दर्जा दिला जातो. यामुळे त्यांनी याच भावनेतून रुग्णसेवा द्यायला हवी. प्रगत देशात विशेष मुलांना अपंग म्हणणेही चुकीचे ठरते. अशा मुलांसाठी त्यांच्याकडे अनेक सोयी उपलब्ध आहेत. परंतु आपण आजही या संदर्भात केवळ चर्चेपुरतेच मर्यादित आहोत. आपल्या शाळांमध्ये अस्थिव्यंग असलेल्या मुलांसाठी अद्यापही सोयी नाहीत. अशा मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा, असेही ते म्हणाले. आ. डॉ. माने यांनी, परिषदेचे कौतुक करीत, अशा परिषदेच्या माध्यमातून नवनवीन ज्ञानात भर पडते, सरकार अपंग मुलांच्या उज्ज्वल भविष्येसाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. यशवंत पाटील यांनी केले. स्वागतपर भाषण डॉ. उदय बोधनकर यांनी केले. संचालन डॉ. राजीव मेहता व डॉ. स्मिता देसाई यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सॅम लिंगम, डॉ. प्रकाश सागवी, डॉ. उदय बोधनकर, डॉ. विरल कामदार आणि डॉ. सरिता आमदार यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)