शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीसाठी असा करा अर्ज

By admin | Updated: August 4, 2014 00:57 IST

२०१४-१५ च्या शैक्षणिक सत्रात १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ३०आॅक्टोबर २०१४ पूर्वी जात प्रमाणपत्र

नागपूर : २०१४-१५ च्या शैक्षणिक सत्रात १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ३०आॅक्टोबर २०१४ पूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.३ चे उपायुक्त सुर्रेद्र पवार यांनी केले आहे.अर्जधारकांनी आॅनलाईन अर्ज भरून आवश्यक पुराव्यासह परिपूर्ण भरलेले व प्राचार्याची सही असलेले अर्ज महाविद्यालयाच्या पत्रासह प्रस्ताव समिती कार्यालयात सादर करावे. विलंबाने प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही. फक्त नागपूर जिल्ह्यातून निर्गमित असलेले जातीचे प्रमाणपत्र स्वीकारले जाणार आहे. अनुसूचित जमातीसाठी १९६१ पूर्वीचे व इतर मागासवर्गाकरिता १९६७ पूर्वीचे जातीचे तसेच महराष्ट्रातील वास्तव्याचे पुरावे आवश्यक आहे. नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थी इतरत्र शिकत असले तरी त्यांनी त्यांचे प्रस्ताव मुदतीत सादर करावे. मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याची माहिती पवार यांनी दिली.बीई व्दितीय वर्षाला प्रवेश घेतेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज ज्यांनी गुणवत्तेनुसार प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रवेशानंतर एक महिन्याच्या आत सीएपीएसच्या पत्रासह अर्ज सादर करावे. तसेच एमबीए व एमसीए मध्ये सीएपीएस अंतर्गत प्रवेश घेतल्यानंतर एक महिन्यात अर्ज सादर करावे. बीई प्रथम वर्ष,एमबीबीएस प्रथम वर्ष, बीएएमएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव मुदत १५ जुलै होती. आता त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. यापुढे समिती कार्यालयात अर्ज आॅनलाईन स्वीकारले जातील. अर्जदारांनी आॅनलाईन अर्ज करून त्याची प्रत काढून आवश्यक कागदपत्रासह विभागीय जात पडताळणी समितीच्या सिव्हिल लाईन कार्यालयात सादर करावयाचे आहे. (प्रतिनिधी)