शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नका

By admin | Updated: May 30, 2016 02:16 IST

नागपूर शहराला प्रदूषणमुक्त करावयाचे आहे. यासाठी दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उद्योगासाठी पुनर्वापर करावा.

नितीन गडकरी : एसटीपी प्रकल्पाचे लोकार्पणनागपूर : नागपूर शहराला प्रदूषणमुक्त करावयाचे आहे. यासाठी दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उद्योगासाठी पुनर्वापर करावा. पिण्याच्या पाण्याचा वापर उद्योगांनी करू नये, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.नरेंद्रनगर भागातील पीएमजी कॉलनी येथे जपानच्या कंपनीने प्रतिदिन १० हजार लिटर क्षमतेचा एसटीपी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होेते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रा.अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, जपानच्या डायको एक्सेस कंपनीचे संचालक हिरोशी ओगमे, प्रबंधक रुई ओवेसा आदी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे नाल्यातील पाण्याचा उद्यानासाठी पुनर्वापर केला जाणार आहे. शहरातील उद्यानासाठी अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्याची गरज आहे. दूषित पाण्याचा पुनर्वापर केल्याने पिण्याच्या पाण्याची बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याचा वापर इतर कामासाठी न करता दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर करावा. महापालिका अशा स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करीत आहे. दूषित पाण्यावर प्रक्रिया करताना त्यापासून मिथेन गॅस व सीएनजी गॅस निर्माण होईल. भांडेवाडी येथे अशा स्वरुपाचा प्रकल्प उभारला जात आहे. यावर शहरातील बसेस चालणार आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाला मदत होणार असल्याचे गडकरी म्हणाले.या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज १० हजार लिटर दूषित पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. महापालिकेने येथे टाकी निर्माण केली आहे. यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याचे प्रवीण दटके यांनी सांगितले. सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, सुनील अग्रवाल, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रकाश तोतवानी, अतिरिक्त उपायुक्त संजय काकडे, मुख्य अभियंता उल्हास देबडवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मो. इसराईल यांनी तर संचालन अविनाश ठाकरे यांनी केले. उपस्थितांचे आभार सुरेश भजे यांनी मानले. (प्रतिनिधी)