शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दलित किंवा नवबौद्ध वापरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:27 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे आपण केवळ बौद्ध आहोत. तेव्हा आपण स्वत:ला दलित किंवा नवबौद्ध म्हणवून घेऊ नका.

ठळक मुद्देराजरत्न आंबेडकर : बौद्ध म्हणूनच ओळख प्रस्थापित करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे आपण केवळ बौद्ध आहोत. तेव्हा आपण स्वत:ला दलित किंवा नवबौद्ध म्हणवून घेऊ नका. बौद्ध म्हणणूनच स्वत:ची ओळख प्रस्थापित करा. तसेच सरकारने सुद्धा दलित-नवबौद्ध याचा वापर करू नये, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)चे कार्यकारी अध्यक्ष राजरत्न अशोक आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. राजरत्न आंबेडकर म्हणाले, जनगणनेनुसार देशात बौद्धांची लोकसंख्या ८४ लाख इतकी सांगितली जात आहे. ती चुकीची आहे. ही संख्या कितीतरी अधिक आहे. यासाठी आपण स्वत: बौद्धांची जनगणना करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात तफावत आढळून आल्यास न्यायालयात आव्हान दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल सुरू असून देशभरात शाळा कॉलेज उभारण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.संस्था सर्व न्यायालयीन लढाईतून मुक्त२१ जून २०१३ रोजी न्यायालयाने अशोक आंबेडकर यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या निकालानंतर संस्थेवरील मीराताई आंबेडकर यांचा दावा फेटाळण्यात आला असून बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया ही सर्व न्यायालयीन लढाईतून मुक्त झाली आहे, असा दावाही राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी केला.ज्योतीकर हे विहिंपचे कार्यकर्तेसंस्थेचे विश्वस्त पी.जी. ज्योतीकर हे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त असलेला व्यक्ती अगदी विरोधाभासी असलेल्या संस्थेत कसे काय काम करू शकतो. त्यांनी चंद्रबोधी पाटील यांच्या माध्यमातून बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाला भाजपा व विहिंपच्य दावनीला बांधण्याचे काम केले आहे. त्यामुळे ज्योतीकर यांना विश्वस्त पदावरून काढण्यासाठी न्यायालयीन कारवाई केली जात असल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.प्रकाश आंबेडकरांनी केले संस्थेच्या घटनेचे उल्लंघनप्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच पुण्यातील दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला भेट दिली. त्यांची ही भेट राजकीय नेता म्हणून योग्य असली तरी भारतीय बौद्ध महासभेच्या नियमाचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे त्यांना या उल्लंघनाबद्दल संस्थेचे सदस्य होता येणार नसल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले.