शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन समिती ५९६ कोटींची

By admin | Updated: March 22, 2017 02:53 IST

जिल्ह्याच्या विकासासाठी आता भरपूर निधी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा नियोजन समितीमध्ये

गतवर्षीच्या तुलनेत १२.७ टक्के वाढ : विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी नागपूर : जिल्ह्याच्या विकासासाठी आता भरपूर निधी उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा नियोजन समितीमध्ये २०१७-१८ या वर्षासाठी तब्बल ५९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहेय. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत या निधीत १२.७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी आग्रही राहिले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना गेल्या तीन वर्षात यश आल्याचे मंजूर झालेल्या निधीवरून दिसून येते. मागील वर्षी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना मिळून ५२९ कोटी नागपूर जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले होते. यंदा ही रक्कम ५९५ कोटींपर्यंत गेली आहे. शासनाने डीपीसी अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण योजनांकरिता ४०० कोटींचा निधी अर्थसंकल्पित झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० कोटींची भरीव वाढ यंदा शासनाने केली आहे.अनुसूचित जाती उपयोजनांसाठी १२४ कोटी १ लाख रुपये नियतव्यय शासनाने मंजूर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात १४ कोटी रुपये (१२.७५ टक्के) भरीव वाढ केली आहे. तसेच आदिवासी उपयोजनांसाठी यंदा ७२ कोटी रुपये शासनाने उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या वर्षी आदिवासी उपयोजनांसाठी ६९ कोटी रुपये दिले होते. यातही शासनाने ४ टक्के वाढ केली आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी वार्षिक योजनेत एकूण ५९६ कोटी रुपयांचा नियतव्यय शासनाने मंजूर केला आहे. यापूर्वी नागपूर जिल्ह्याला ८० ते १२५ कोटी दरम्यान निधी उपलब्ध होत होता. पण पालकमंत्र्यांनी दरवर्षी मुख्यमंत्र्यांकडे व अर्थमंत्र्यांना विनंती करून हा निधी वाढविण्याची मागणी केली होती. विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीची वस्तुस्थिती लक्षात घेता शासनाने पालकमंत्र्यांची मागणी मान्य करीत डीपीसीमार्फत जिल्ह्यात होणाऱ्या विकास निधीत भरीव वाढ केली आहे.(प्रतिनिधी)