शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

रिफार्म क्लबवरील जुगार धाडीने जिल्हाधिकारी अडचणीत

By admin | Updated: September 5, 2014 01:06 IST

रिफार्म नामक मनोरंजन क्लबमधील जुगार अड्डयावर धाड घालून पोलिसांनी २० जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक केली होती. पोलिसांच्या या धाडीने मोठा तिढा निर्माण झाला आहे. या क्लबचे पदसिद्ध अध्यक्ष विद्यमान

सतीश येटरे - यवतमाळ रिफार्म नामक मनोरंजन क्लबमधील जुगार अड्डयावर धाड घालून पोलिसांनी २० जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक केली होती. पोलिसांच्या या धाडीने मोठा तिढा निर्माण झाला आहे. या क्लबचे पदसिद्ध अध्यक्ष विद्यमान जिल्हाधिकारी असतात. त्यामुळे आता जुगारप्रकरणात दस्तुरखुद्द जिल्हाधिकारीच अडचणीत सापडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांची ही डोकेदुखी दूर करण्याची जबाबदारी कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच येऊन पडली आहे. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी आता पळवाटा शोधल्या जात आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वी रात्री ११ वाजता गोपनीय माहितीवरून येथील रिफार्म क्लबवर उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांच्या पथकाने धाड घातली. यावेळी शहरातील प्रतिष्ठीत जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यात हॉटेल मालक, प्रसिध्द स्वीट मार्टचा मालक, प्रसिध्द छायाचित्रकार, आर्कीटेक्चर, स्टील भांड्याचा व्यापारी, एका फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी आदी २० जणांचा समावेश होता. जुगाऱ्यांना अटक केल्यानंतर त्यांना ‘व्हीआयपी’ ट्रिटमेंट देऊन रेकॉर्डवर मुद्देमालाची थातूर-मातूर जप्ती दाखविल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्याची सारवासारव होत नाही तोच, या कारवाईने जुगाराशी काही एक संबंध नसलेले दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी अडचणीत आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या बाबीची वाच्यता होेऊ नये म्हणून प्रचंड गोपनीयता बाळगली. परंतु या धाडीने दुखावलेल्या प्रतिष्ठित जुगाऱ्यांनी त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या कानापर्यंत पोहोचवलीच. आता पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विधी सल्लागारांचेही मार्गदर्शन घेण्यात आल्याची माहिती आहे.