शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचे व्यवहार लवकरच

By admin | Updated: December 20, 2014 02:28 IST

नागपूर जिल्हा बँकेचे व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविलेल्या बैठकीनंतर निर्माण झाली आहे.

नागपूर : नागपूर जिल्हा बँकेचे व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविलेल्या बैठकीनंतर निर्माण झाली आहे. बँकेला मदतीच्या विशेष योजनेंतर्गत केंद्र, राज्य आणि नाबार्ड यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. त्यानुसार बँकेला आर्थिक मदत आणि रिझर्व्ह बँकेतर्फे आर्थिक परवाना मिळण्याची दाट शक्यता आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षापूर्वी बँकेचे व्यवहार सुरू होतील, यावर वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी बैठक बोलविली होती. मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सहकारी मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य सहकार मंत्री दादाजी भुसे, सहकार सचिव राजगोपाल देवरा, सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर, नाबार्डच्या पुणे विभागीय कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक सहा, मुंबईचे अधिकारी बन्सल, राज्य बँकेचे व्यवस्थापकीय संचालक कर्नाड आणि बँकांचे अधिकारी उपस्थित होते. सामंजस्य करारानुसार केंद्र, राज्य आणि नाबार्डकडून आर्थिक मदत मिळाल्यास बँकेला रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक परवाना मिळण्यास काहीच अडचण राहणार नाही. करारानुसार नियम आणि शर्तीनुसार बँकेला प्रगतीचा तीन वर्षांचा कृती आराखडा द्यावा लागेल. यात बँकेची कार्यपद्धत, ठेवी, एनपीए, नफा आदींचा समावेश राहील. ३१ मार्च २०१५ पर्यंत ७ टक्के सीआरएआर कायम ठेवावा लागेल. याशिवाय ३१ मार्च २०१७ पर्यंत सीआरएआर ९ टक्क्यांवर आणावा लागेल. बँक सुरू झाल्यानंतर स्थापन करण्यात येणाऱ्या संचालक मंडळात बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, महाराष्ट्र शासन आणि राज्य बँकेच्या अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात येणार आहे. या समितीचा कार्यकाळ तब्बल तीन वर्षांचा राहील. या काळात समिती घेईल ते निर्णय बँकेला मान्य राहील. बँकेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येईल. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने आता बँक नियमित सुरू होण्याची आशा ठेवीदार आणि खातेधारकांमध्ये निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)