शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधील वाद हायकोर्टात

By admin | Updated: May 24, 2017 02:30 IST

महानगरपालिकेत काँग्रेसचा गटनेता निवडण्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे.

मनपा गटनेता निवडण्याचे प्रकरण : महाकाळकर यांची याचिका लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महानगरपालिकेत काँग्रेसचा गटनेता निवडण्याचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. काँग्रेसचे नगरसेवक संजय महाकाळकर यांनी त्यांना गटनेतेपदावरून हटविण्याच्या आदेशाला आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी सोमवारी प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त व नवनिर्वाचित गटनेते तानाजी वनवे यांना नोटीस बजावून येत्या शुक्रवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. विभागीय आयुक्तांनी १९ मे रोजी सदर वादग्रस्त आदेश जारी केला आहे. त्यावर महाकाळकर यांचा आक्षेप आहे. विभागीय आयुक्तांना असा आदेश जारी करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा आदेश रद्द करून तानाजी वनवे यांची गटनेतेपदावरील निवड अवैध घोषित करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. वनवे यांनी महाकाळकर यांच्यावर अविश्वास दर्शवून १६ मे रोजी वर्धा मार्गावरील प्रगती भवन येथे नगरसेविका हर्षला साबळे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस सदस्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत १७ सदस्य उपस्थित होते. त्यात वनवे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यातील चार सदस्यांच्या स्वाक्षऱ्या बोगस असल्याचा दावा महाकाळकर यांनी नंतर केला होता. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी प्रकरणाची पडताळणी करण्याचा आदेश मनपाच्या निगम सचिवांना दिला होता. १७ मे रोजी झालेल्या पडताळणीत १६ सदस्यांनी वनवे यांना पाठिंबा दर्शविला तर, नगरसेवक रमेश पुणेकर गैरहजर राहिले. मनपातील काँग्रेसच्या २९ पैकी १६ सदस्यांनी वनवे यांना पाठिंबा दर्शविल्यामुळे पक्षाच्या गटनेतेपदी त्यांची निवड करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला. महाकाळकर यांच्यातर्फे अ‍ॅड. अजय घारे यांनी बाजू मांडली.