शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘हायटेक’ विद्यापीठाला संकेतस्थळ ‘अपडेट’चा तिटकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाल्यानंतर त्यातच बहुधा प्रशासन ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाल्यानंतर त्यातच बहुधा प्रशासन समाधानी आहे. तंत्रज्ञानाच्या युगात संकेतस्थळ हे विद्यापीठाला सर्व जगाशी जोडणारे माध्यम आहे. मात्र, ‘ऑनलाईन’ सुधारणांचे मोठमोठे दावे होत असलेल्या संकेतस्थळाकडे अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. संकेतस्थळावर अद्यापही जुनीच माहिती उपलब्ध असून, अधिष्ठात्यांची यादी बदलण्याची तसदीदेखील विद्यापीठाने घेतलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे विद्वत परिषदेच्या अधिकृत यादीत उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखन हेच वर्तमान कुलसचिव असल्याचे दाखविण्यात येत आहे.

अनेक विद्यार्थी विभाग, प्राधिकरण, त्यातील सदस्य यांची माहिती व्हावी यासाठी संकेतस्थळाचा आधार घेतात. परंतु, नागपूर विद्यापीठाने संकेतस्थळावर अद्यापही प्राधिकरणांची यादी ‘अपडेट’ केलेली नाही. सिनेट, विद्वत्त परिषद इतकेच काय, तर व्यवस्थापन परिषदेच्या यादीत जुनीच नावे दाखविण्यात येत आहेत. मानव्यविज्ञान शाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. निर्मलकुमार सिंग हे निवृत्त झाले आहेत. मात्र, यादीत अद्यापही ते व्यवस्थापन परिषदेवर असल्याचे दाखविण्यात येत आहे. सोबतच भूविज्ञानशास्त्र विभागप्रमुख डॉ. कीर्तीकुमार रणदिवे यांचे व्यवस्थापन परिषदेवर कुलगुरूंनी नामनिर्देशन केले. मात्र, त्यांच्याऐवजी अद्यापही संस्कृत विभाग प्रमुख डॉ. दलाल यांचेच नाव संकेतस्थळावरील अधिकृत यादीत आहे. असाच प्रकार सिनेट व विद्वत्त परिषदेच्या यादीतदेखील झाला आहे. विद्वत्त परिषदेच्या अधिकृत यादीत डॉ. राजेश शिंगरू हेच विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता असल्याचे दाखविले आहे. प्रत्यक्षात डॉ. प्रशांत माहेश्वरी हे सद्य:स्थितीत अधिष्ठाता आहेत. अधिष्ठाता मंडळाची यादीदेखील अद्यापही जुनीच आहे.

अधिकृत यादीत हिरेखनच कुलसचिव

विद्वत्त परिषदेच्या यादीत कुलसचिव म्हणून डॉ. अनिल हिरेखन यांचेच नाव दर्शविण्यात येत आहे. डॉ. राजू हिवसे यांची नियुक्ती होऊन अनेक आठवडे झाले आहेत. मात्र, तरीदेखील यादी ‘अपडेट’ करण्याची तसदी अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही.

संकेतस्थळाला नवीन रूप, याद्या मात्र जुन्याच

‘ई-रिफॉर्म्स’साठी नागपूर विद्यापीठाने अनेक सकारात्मक पावले उचलली. परंतु, ‘ऑनलाईन’ सुधारणांचे मूलभूत अंग असलेल्या संकेतस्थळाचा मात्र हवा तसा विकास झालेला नाही. अनेकदा तर संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीवर प्रशासनाच्या विविध अधिसूचना, परिपत्रके वेळेवर ‘अपलोड’च होत नसल्याचे आढळून आले आहे. यासंबंधात प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना कधीही जाब विचारला जात नाही हे विशेष. काही दिवसांअगोदरच विद्यापीठाने संकेतस्थळाला नवीन स्वरूप दिले आहे. परंतु, प्रत्यक्षात असे करत असताना अनेक जुने निर्णय ‘अपलोड’च करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण जात आहे.