शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायीच्या प्रवास भत्त्यांपासून रुग्ण वंचित

By admin | Updated: June 2, 2017 02:33 IST

गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभार्थी रुग्णांना मोफत

रक्कम दिल्याचे छायाचित्र काढून घेताच परत घेतात रक्कम : रुग्णाच्या नातेवाईकाची तक्रारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभार्थी रुग्णांना मोफत उपचारासोबतच प्रवास भत्ताही दिला जातो, मात्र मेडिकलमध्ये रुग्णांच्या हातात ही रक्कम देऊन छायाचित्र काढून घेतल्यानंतर, ती रक्कम परत घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाने समोर येऊन ही तक्रार केली. विशेष म्हणजे, तक्रारकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांपासून ते अधिष्ठात्यापर्यंत सर्वांकडे दाद मागितली, मात्र अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हिताची ठरत आहे. मात्र काही कर्मचारी पैशाच्या हव्यासापोटी या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्यापर्यंत त्यांचा लाभ पोहचू देत नसल्याचे चित्र आहे. या योजनेंतर्गत संबंधित रुग्णाला उपचारानंतर रुग्णालयातून सुटी झाल्यावर घरी परत जाण्याकरिता तो राहत असलेल्या गाव किंवा शहरातील अंतरानुसार विशिष्ट रक्कम प्रवास भत्त्याच्या स्वरूपात रोख दिली जाते. याचा पुरावा म्हणून योजनेच्या कर्मचाऱ्याला रुग्णाला रक्कम दिल्याचे छायाचित्र काढावे लागते. योजनेच्या सिस्टिममध्ये हे छायाचित्र अपलोड करावे लागते. मात्र, कर्मचारी रुग्णांना पैसे देतात, पण छायाचित्र काढल्यानंतर ही रक्कम रुग्णाकडून परत घेतात. कुणी आक्षेप घेतल्यास आमच्याकडे छायाचित्र पुरावा असून तुम्ही रक्कम मिळाली नाही, असे स्पष्ट करू शकत नसल्याचे सांगत नातेवाईकांना हुसकावून लावतात. मेडिकलमध्ये हा प्रकार अनेक रुग्णांसोबत झाल्याचे सामोर आले आहे. औषधांचे बिलही मिळत नाहीया योजनेंतर्गत रुग्णाने औषध बाहेरून आणल्यास त्यांना ही बिले कालांतराने मेडिकल प्रशासनाकडून अदा केली जातात, परंतु मेडिकलमध्ये ही रक्कम देण्याकरिता लिपिक व डॉक्टर टाळाटाळ करतात. एका कर्करुग्णासोबत हा प्रसंग घडला आहे. त्यातच या रुग्णांना प्रवास भत्त्याची रक्कम दिल्याचे छायाचित्र काढताच हे कर्मचारी रक्कम परत घेतात. ही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांसह अनेकांना केली आहे. परंतु अद्यापही कारवाई झालेली नाही. -अविनाश गडेकर, तक्रारकर्ता