शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

घरकामगारांसाठीही आता डिप्लोमा

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे मोलकरणींच्या शिक्षणासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत ज्या मोलकरणींचे शिक्षण अर्धवट राहिले आहे,

विदर्भ मोलकरीण संघटनेचा उपक्रम : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम नागपूर : विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे मोलकरणींच्या शिक्षणासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत ज्या मोलकरणींचे शिक्षण अर्धवट राहिले आहे, त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देऊन त्यांना पदविका देण्याचा संकल्प संघटनेने केला. यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. कृष्णकुमार चौबे यांच्याशी चर्चा करून रुपाताई कुळकर्णी यांनी एक अभ्यासक्रम तयार केला. विद्यापीठाने हा अभ्यासक्रम मान्य करून तो राबविण्याची तयारी दर्शविली. या अभ्यासक्रमाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम सर्वोदय आश्रम, विनोबा विचार केंद्र येथे पार पडला. याप्रसंगी डॉ. रुपाताई कुळकर्णी आणि अ‍ॅड. विलास भोंगाडे यांच्या हस्ते या घरकामगार डिप्लोमा अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या अभ्यासक्रमाला प्रथमच महाराष्ट्रातून नागपूर, नाशिक आणि हिंगोली या तीन केंद्रातून प्रत्येकी ५६ विद्यार्थ्यांची नावे नोंदविण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक मोलकरणीला केवळ १०० रुपये शुल्क द्यावे लागणार असून उर्वरित ९०० रुपयांचे शुल्क राज्य शासनाचे घरेलु कामगार बोर्ड देणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे सचिव विलास भोंगाडे होते. अभ्यासक्रमाच्या नागपूर येथील केंद्र समन्वयक अ‍ॅड. जुई मेश्राम यांनी यावेळी मोलकरणींना मोठी स्वप्न पाहण्याचे आवाहन केले. विलास भोंगाडे यांनी संघटनेचे बळ वाढविण्याचे आवाहन केले. रुपाताई यांनी हा उपक्रम सर्व मोलकरणींनी यशस्वी करावा, असे आवाहन केले. याप्रसंगी विद्या हटवार आणि विजया शिंगणे यांचीही भाषणे झाली. छाया चवळेंनी प्रास्ताविक तर शैला पपालकर यांनी आभारप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)