शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जेवणाची थाळी, साडेचार लाखांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वस्तात काही मिळतेय या अपेक्षेने अनेकजण फेक जाहिरातींना क्लिक करतात आणि तिथेच फसतात. असाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वस्तात काही मिळतेय या अपेक्षेने अनेकजण फेक जाहिरातींना क्लिक करतात आणि तिथेच फसतात. असाच काहीसा प्रकार नागपुरातील महिलेसोबत घडला. फेसबुकवर जेवणाची थाळी पाहिली आणि कुठलाही विचार न करता ऑर्डर दिली. काही वेळातच सायबर गुन्हेगाराने या महिलेचे तब्बल साडेचार लाख रुपये लंपास केले. ही धक्कादायक घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ मार्च दुपारी १२ वाजता घडली. बुधवारी, १७ मार्च रोजी गिट्टीखदान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

दाभा येथील अर्चना मकरंद पंडित (वय ४९) यांनी फेसबुकवर जेवणाच्या थाळीची जाहिरात बघितली. तेथे नमूद मोबाईलवर पंडित यांनी संपर्क केला असता, आरोपीने त्यांना टेक लिंक पाठवली आणि ॲप डाऊनलोड करण्यास सांगून दहा रुपये पेड करा, असेही सांगितले. पंडित यांनी तसेच केले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतल्याचा त्यांना मेसेज आला. त्यांनी यासंबंधाने पुन्हा आरोपीशी संपर्क साधला असता आरोपीने त्यांना रक्कम परत करतो, अशी बतावणी करून त्यांना ओटीपी विचारला. त्यानंतर वेगवेगळ्या वेळेला त्यांच्या खात्यातून एकूण चार लाख ४४ हजार रुपये काढून घेतले. सायबर गुन्हेगाराने रक्कम लांबविल्याचे लक्षात आल्यानंतर पंडित यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रकरण चौकशीसाठी सायबर शाखेत गेले. त्यानंतर या प्रकरणी बुधवारी पंडित यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आयटी ॲक्ट तसेच फसवणुकीच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

---