शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जाच हवा

By admin | Updated: August 26, 2015 03:06 IST

राज्य शासनातर्फे दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते.

आमदारांची एकमुखी मागणी : डीपीसीत करणार मागणीनागपूर : राज्य शासनातर्फे दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते. असे असतानाही जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यास शासनाने ‘कंजुषी’ का दाखविली? असा सवाल करीत आंबेडकरी जनतेने शासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असताना आता लोकप्रतिनिधींनीही दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाच हवा, अशी मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अशा स्वरूपाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याची मागणी केली जाईल, असेही आमदारांनी स्पष्ट केले आहे. भाजपचे आ. सुधाकरराव देशमुख म्हणाले, तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाला दर्जा देताना काही निकष लावले जातात. वर्षाला एक लाख लोक भेट देत असतील तर ‘क’ वर्ग, चार लाख लोक भेट देत असतील तर ‘ब’ वर्ग व त्यावर असेल तर ‘अ’ वर्ग करण्याची प्रक्रिया करावी लागते. टप्प्याटप्प्याने तसा प्रस्ताव प्रस्ताव सादर करावा लागतो. राज्य सरकारने दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग दर्जा दिला आहे. दीक्षाभूमीवर एकाच दिवशी १० ते १५ लाख लोक येतात. इतर वेळीही देश-विदेशातील अनुयायी येथे भेट देतात. नागपुरातील हे एक मोठे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीमध्ये सादर करून मंजूर करण्याची मागणी केली जाईल. राज्य सरकार या प्रस्तावाची दखल घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनीही ‘अ’ वर्ग देण्याचे समर्थन केले. दीक्षाभूमी, ताजबाग, टेकडी गणेश मंदिर या तिन्ही स्थळांवर लाखो लोक येतात. पर्यटन व ऐतिहासिक स्थळांच्या यादीतही यांचा समावेश आहे. दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जा देण्यात काही प्रशासकीय अडचणी असतील तर राज्य सरकारने त्या दूर कराव्यात. गरजेनुसार तरतुदींमध्ये सुधारणा करावी. दीक्षाभूमी हे देशातील महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे, असेही खोपडे म्हणाले. आ. सुधाकर कोहळे म्हणाले, शासनातर्फे कोणत्याही संस्थेला टप्प्याटप्प्याने वाढीव दर्जा दिला जातो. दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग दर्जा दिला आहे. राज्य सरकारने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा द्यावा. आ. डॉ. मिलिंद माने म्हणाले, यापूर्वीच्या सरकारने दीक्षाभूमीला दर्जा देण्याबाबत विचारही केला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दीक्षाभूमीला ‘ब’ वर्ग दर्जा देऊन दीक्षाभूमीच्या विकासाचा मार्ग खुला केला आहे. येत्या काळात सरकारतर्फे निश्चितच ‘अ’ वर्ग दर्जा दिला जाईल. आपण त्यासाठी पाठपुरावा करू.