शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीने घडविले आणि जगविलेही

By admin | Updated: October 21, 2015 03:24 IST

दीक्षाभूमी म्हणजे ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत. वर्षभर कोट्यवधी बांधव दीक्षाभूमीवर येतात. बाबासाहेबांचे तत्त्व आणि विचाराने प्रेरित होऊन मार्गक्रमण करतात.

नागपूर : दीक्षाभूमी म्हणजे ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत. वर्षभर कोट्यवधी बांधव दीक्षाभूमीवर येतात. बाबासाहेबांचे तत्त्व आणि विचाराने प्रेरित होऊन मार्गक्रमण करतात. बौद्ध बांधवांसाठी दीक्षाभूमी एक मार्गदर्शकच नव्हे तर जीवनाचा आधार ठरली आहे. रवी वैरागडे हा तरुण २१ वर्षापूर्वी दीक्षाभूमीवर आला आणि तिथेच स्थिरावला. या भूमीने त्याला जगण्याचा मार्ग दाखवत त्याला घडविले आणि जगविले. दीक्षाभूमीवर कधीही जा उन्हात, पावसात रवी वैरागडे हा फोटोग्राफर आपला कॅमेरा घेऊन दीक्षाभूमीवर येणाऱ्यांचे फोटो काढताना दिसतो. १९९४ फुलनदेवी दीक्षाभूमीच्या दर्शनासाठी आली असता, रवी यांनी दीक्षाभूमीत तिचा पहिला फोटो काढला. दीक्षाभूमीवरील हा पहिला फोटो त्याच्या जीवनाला कलाटणी देऊन गेला. फुलनदेवीचा फोटो काढल्यानंतर तिथे फिरत असताना, काही लोकांनी आमचाही फोटो काढण्याचा आग्रह केला. त्या मोबदल्यात पैसेही देऊ असे सांगितले. रवीने त्यांचा पत्ता लिहून घेतला आणि फोटो तयार करून, त्यांच्या पत्त्यावर पाठविला. त्यांना फोटो मिळाल्यानंतर धन्यवादाचे पत्र रवीला पाठविले. हे पत्र रवीला जगण्याचे मार्ग दाखवून गेले. जेमतेम बारावी झालेल्या रवीने एक वर्षाचे फोटोग्राफीचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. व्यवसाय करण्यासाठी पैसा नव्हता. फोटोग्राफीवर अपेक्षित असा रोजगारही मिळत नव्हता. त्यामुळे तो दररोज आपला कॅमेरा घेऊन दीक्षाभूमीवर बसायचा. देशाच्या कानाकोपऱ्यातून दीक्षाभूमीवर आलेल्या गोरगरीब बांधवांचे फोटो काढायचा. त्यांचे फोटो पोस्टाद्वारे पाठवायचा. हळूहळू करता हे त्याचा रोजगाराचे साधन बनले. देशाच्या कानाकोपऱ्यात रवीने काढलेले फोटो अनेकांच्या घरात पोहचले आहे. अनेकांनी फोटो मिळाल्याचे धन्यवादाचे पत्र त्याला पाठविले आहे. (प्रतिनिधी)