शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भावर यांची बोलती बंद का?

By admin | Updated: August 29, 2016 02:39 IST

विदर्भ खऱ्या अर्थाने खूप मोठा आहे. भारताचे हे हृदय आहे. ते मजबूत झाले पाहिजे. विदर्भाच्या प्रवक्त्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी आवाज बुलंद केला होता.

फडणवीस-गडकरींना वेद प्रताप वैदिक यांचा सवाल : भंवर मे सियासत पुस्तकाचे प्रकाशननागपूर : विदर्भ खऱ्या अर्थाने खूप मोठा आहे. भारताचे हे हृदय आहे. ते मजबूत झाले पाहिजे. विदर्भाच्या प्रवक्त्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी आवाज बुलंद केला होता. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बोलती बंद का आहे, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांनी येथे केला. रविनगर चौकातील अग्रसेन भवन येथे रविवारी सायंकाळी बी.जे. अग्रवाल लिखित ‘भंवर मे सियासत’ या हिंदी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी समीक्षक म्हणून ते बोलत होते. बबनराव ढाकणे अध्यक्षस्थानी होते. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा मुख्य अतिथी होते. माजी गृहमंत्री जयंत पाटील, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, डिस्ट्रीक्ट बार कौन्सिलचे अध्यक्ष सुदीप जयस्वाल, अग्रसेन मंडळच्या अध्यक्ष उर्मिला अग्रवाल, माजी महापौर किशोर डोरले व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे उपस्थित होते. जयंत पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले. बी.जे. अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन संदीप अग्रवाल यांनी केले. विजय जैन यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)जनतेच्या कार्यासाठी समर्पित जीवन मुख्य अतिथी म्हणून आपले विचार व्यक्त करतांना विजय दर्डा म्हणाले, अ‍ॅड. बी.जे. अग्रवाल यांनी आयुष्यभर इमानदारीने काम केले. माजी पंतप्रधान चंद्रशेखर व माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्यासोबत त्यांनी जनतेसाठी काम केले. वकील म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले. माझ्या वडिलांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. या पुस्तक प्रकाशनासाठी इतके लोक आलेत ते यथोचितच असल्याचेही ते म्हणाले.