खापरखेडा : चाेरट्याने घरफाेडी करीत हिरे व साेन्याचे दागिने चाेरून नेले. त्या दागिन्यांची किंमत ५९ हजार रुपये आहे. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथे रविवारी (दि. २) मध्यरात्री घडली.
सिकंदर प्रसाद जियानंद सिंग (६२, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) हे कुटुंबीयांसह त्यांच्या मुलीकडे नागपूरला गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराची कडी ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने कपाटातील २५ हजार रुपयांचे हिरेजडीत लाॅकेट व ३४ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने असा एकूण ५९ हजार रुपयांचा ऐवज चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच सिकंदर सिंग यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार मेश्राम करीत आहेत.