शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकावरील हिरकणी कक्ष गायब ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

नागपूर : प्रवासात आपल्या तान्हुल्याला दूध पाजताना महिलांची कुचंबणा होते. त्यासाठी एसटी महामंडळाने पाऊल उचलून बसस्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन ...

नागपूर : प्रवासात आपल्या तान्हुल्याला दूध पाजताना महिलांची कुचंबणा होते. त्यासाठी एसटी महामंडळाने पाऊल उचलून बसस्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन केले. नागपूरच्या मध्यवर्ती गणेशपेठ बसस्थानकावरही हा कक्ष स्थापन केला. परंतु हा कक्षच सद्यस्थितीत गायब झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवासात आपल्या बाळाला दूध पाजणाऱ्या महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे.

एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करून नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावर हिरकणी कक्ष सुरू केला. सुरुवातीला दोन वर्षे हा कक्ष सुरळीत सुरू होता. त्यानंतर या कक्षाला कुलूप लावून ठेवण्यात आले. कालांतराने या कक्षाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या कक्षात धूळ, अस्वच्छता पसरण्यास सुरुवात झाली. मागील तीन वर्षांपासून गणेशपेठ बसस्थानकावरील हिरकणी कक्षच गायब झाला असून त्या ठिकाणी महामंडळाने रेस्ट रूम बांधल्या आहेत. यामुळे प्रवासात आपल्या बाळाला दूध पाजताना महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे. महिलांच्या सुविधेसाठी बसस्थानकावर हिरकणी कक्ष असणे गरजेचे आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने महिला प्रवाशांच्या सुविधेसाठी त्वरित हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्याची मागणी महिला प्रवासी करीत आहेत.

..................

नूतनीकरणात अडकला हिरकणी कक्ष

गणेशपेठ बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. परंतु हे काम मागील वर्षभरापासून रखडले आहे. सुरुवातीला हिरकणी कक्ष असलेल्या ठिकाणी महामंडळाने रेस्ट रूम तयार केल्या आहेत. नूतनीकरणाच्या कामात हिरकणी कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या रेस्ट रूमच्या शेजारी एक जागा ठरविण्यात येऊन पिल्लर उभारण्यात आले आहेत. परंतु प्रत्यक्षात हिरकणी कक्ष कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता आहे.

कक्षाबाबत केला नाही प्रचार-प्रसार

हिरकणी कक्ष सुरू करताना एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा केला होता. प्रसारमाध्यमात प्रसिद्धी केली होती. परंतु या महत्त्वाच्या योजनेकडे नंतर महामंडळानेच कानाडोळा केला. बसस्थानकावर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध आहे याची साधी घोषणाही महामंडळाने ध्वनिक्षेपकावरून केली नाही. त्यामुळे बहुतांश महिलांना हिरकणी कक्ष सुरू झाल्याचीच माहिती मिळू शकली नाही. एसटी महामंडळाच्या उदासीन धोरणामुळे या कक्षाचा हवा तसा प्रचार-प्रसार होऊ शकला नाही. कालांतराने बसस्थानकावरून हा कक्षच गायब झाला आहे.

हिरकणी कक्ष लवकरच सुरू करू

‘गणेशपेठ बसस्थानकावर सध्या हिरकणी कक्ष सुरू नाही. गणेशपेठ बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु हे काम वर्षभरापासून प्रलंबित आहे. प्रवासात महिला प्रवाशांची बाळाला स्तनपान करताना होत असलेली कुचंबणा पाहता हिरकणी कक्ष त्वरित सुरू करण्यात येईल.’

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

..............