शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गर्भावस्थेत मधुमेहाची तपासणी अत्यावश्यक

By admin | Updated: July 28, 2014 01:28 IST

गर्भवतींनी प्रत्येकी तीन महिन्यांच्या अंतराने मधुमेहाची तपासणी केल्यास आणि निदान झाल्यावर योग्य खबरदारी व औषधोपचार घेतल्यास मधुमेहाची रुग्णसंख्या कमी करण्यास हातभार लागू शकतो,

डायबेटीज केअर फाऊंडेशन : दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोपनागपूर : गर्भवतींनी प्रत्येकी तीन महिन्यांच्या अंतराने मधुमेहाची तपासणी केल्यास आणि निदान झाल्यावर योग्य खबरदारी व औषधोपचार घेतल्यास मधुमेहाची रुग्णसंख्या कमी करण्यास हातभार लागू शकतो, अशी माहिती प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी येथे दिली. असोसिएशन आॅफ डायबिटीज एज्युकेटर आणि डायबिटीज केअरच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी परिषदेचा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.गर्भस्थ शिशु व मातेची काळजी हा परिषदेचा मुख्य विषय होता. डॉ. गुप्ता म्हणाले, गर्भावस्थेत मधुमेह होण्याची ५० टक्के शक्यता असते. गर्भावस्थेत या व्याधीचे निदान न झाल्यास बाळाला विकृती किंवा मृत्यू येऊ शकतो. परंतु निदान झाल्यावर हे टाळणे सहज शक्य आहे. काही महिलांमध्ये बाळंतपणानंतर मधुमेह दूर होतो. मात्र, त्यातल्या काही मातांना वयाच्या साधारण ४० व्या वर्षी ही व्याधी घेरण्याची शक्यता असते. यामुळे निदान झालेल्या गर्भवती आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाय सुरू करू शकतात. आहार आणि औषधोपचारातून ती माता मधुमेहाला दूर ठेवू शकते. विशेष म्हणजे, बाळंतपणानंतर मधुमेह असलेल्या माताने बाळाल दूध पाजल्यास त्याला किशोरावस्थेत लठ्ठपणा, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होऊन मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून गर्भावस्थेत प्रत्येक तीन-तीन महिन्यानंतर मधुमेहाची चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे निदान होऊन मधुमेहाला प्रतिबंध घालणे शक्य आहे. शासनानेही या संदर्भात पुढाकार घेतला आहे. सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना गर्भावस्थेत इतर चाचण्यांसोबतच मधुमेहाची चाचणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय रुग्णालयात तशा सोयीही उपलब्धही करून दिल्या आहेत. याची जनजागृती झाल्यास आणि गर्भवतींनी स्वत:हून याची चाचणी करून घेतल्यास आणि सतर्क राहिल्यास पोलिओसारखेच मधुमेहाला दूर ठेवता येऊ शकते.दोन दिवसीय या परिषदेत एकूण १० वैज्ञानिक चर्चा आणि ३० हून अधिक व्याख्यानांमधून विषयतज्ज्ञ मधुमेहाच्या क्षेत्रात जगभर सुरू असलेल्या संशोधनावर प्रकाश टाकला. त्यासाठी ३५० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. प्रमुख वक्त्यांमध्ये डॉ. समर बॅनर्जी (कोलकाता), डॉ. सी. एस. याज्ञिक (पुणे), डॉ. जितेंद्र सिंह (जम्मू), डॉ. शशांक जोशी (मुंबई), डॉ. अजय कुमार (पटणा), डॉ. शैलजा काळे (पुणे), डॉ. उदय थानावाला (मुंबई), डॉ. बन्सी साबू (अहमदाबाद), डॉ. अनुजा माहेश्वरी (लखनौ), डॉ. शोभा गुडी (बंगळूर) यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)