शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे उपोषण आंदोलन

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

घटनेतील तरतुदीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्या, यासाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे.

नागपूर : घटनेतील तरतुदीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्या, यासाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समाजबांधव टप्प्याटप्प्याने या आंदोलनात सहभागी होत आहे. शनिवारी २० जणांनी यात सहभाग घेतला.धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आला आहे. परंतु त्यानुसार या समाजाला कोणत्याही सवलती मिळत नाही. सवलती लागू करण्यासाठी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल महात्मे यांच्या नेतृत्वात वेळोवळी आंदोलन करण्यात आले. परंतु शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे मागण्यासाठी समितीने आंदोलन तीव्र केले आहे. समाजाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आंदोलनाला सर्वक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे. परंतु आदिवासी नेत्यांच्या दडपणामुळे राज्य सरकार मागण्या मान्य करण्यास टाळाटाळ करीत आहे. साखळी उपोषणाने प्रश्न मार्गी लागला नाही तर बेमुदत उपोषणा करू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. उपोषण आंदोलनात दिलीप डाखोडे, अरुण माहुरे, विशाल तांबडे, प्रकाश वारे, कैलास वारे, अजय बुधे, छाया पुरडकर, देवेंद्र बुधे, सुरेखा काउटकार यांच्यासह २० जणांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)