शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र करणार महाराष्ट्राला नंबर वन -नितीन गडकरी

By admin | Updated: October 29, 2014 00:43 IST

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत

नागपूर : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात नंबर वन होईल, अशी विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पत्रकारांसोबत बोलत होते.फडणवीस यांना दूरदृष्टी आहे. त्यांच्या नेतृत्वात मागासलेला विदर्भ, कोकण व मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. नागपुरातील मिहान प्रकल्पाला गती मिळेल. राज्याची आर्थिक प्रगती होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. देवेंद्रला राजकारणात मी आणले. त्याने स्वकर्तृत्वाने राज्याचे नेतेपद मिळविले. फडणवीस राज्याला स्थिर सरकार देतील. त्यांची कारकीर्द यशस्वी होवो, अशा आमच्या शुभेच्छा असल्याचे गडकरी म्हणाले. एकनाथ खडसे नाराज नाहीत. आज दुपारी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली. त्यांनीच नेतेपदासाठी फडणवीस यांचे नाव सुचविले. गेल्या १५ वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकाळात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल. विदर्भासाठी ही मानाची बाब ठरणार असल्याचे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)