शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा क्षेत्रात सहा मैदानांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST

लोकमत न्युज नेटवर्क नागपूर : शहरातील खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात या उद्देशाने शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील सहा ...

लोकमत न्युज नेटवर्क

नागपूर : शहरातील खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात या उद्देशाने शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील सहा मैदानांची पाहणी करून खेळाडूंना खेळण्यासाठी उपयुक्त मैदाने तयार करण्याचे प्रस्तावित आहे. या संदर्भात आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश सोमवारी क्रीडा विशेष समितीच्या बैठकीत सभापती प्रमोद तभाने यांनी दिले. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, सरावासाठी येत असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी उपसभापतींसोबत शहरातील विविध मैदाने आणि क्रीडासंकुलांची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला समितीचे उपसभापती लखन येरवार, सदस्य सर्वश्री अमर बागडे, शेषराव गोतमारे, नरेंद्र वालदे, सदस्या रूपाली ठाकूर, उपायुक्त मिलिंद मेश्राम, मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, क्रीडा नियंत्रण अधिकारी नितीन भोळे आदी उपस्थित होते..

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरातील सर्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास बंदी आहे. मात्र खेळाडूंना सरावासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु क्रीडा स्पधार्मुळे खेळाडूंना जी प्रेरणा मिळते ती केवळ सराव करून मिळत नाही. यामुळे खेळाडूंचे खूप नुकसान होत आहे. म्हणून शहरात कमी खेळाडू असलेल्या स्पधार्चे आयोजन करण्याची परवानगी मागितली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.

शहरात मनपाचे ४ क्रीडासंकुल, ४ स्केटिंग रिंग आणि विभागाद्वारे संचालित ५ व्यायाम शाळा आहेत. तसेच कबड्डी, कुस्ती, आणि खो-खो या खेळांसाठी प्रत्येकी २-२ मॅट घेण्यात आल्याची माहिती क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांनी दिली.

....

बैठकीतील निणंय

-विधानसभानिहाय मैदानाचे सर्व्हे करून योग्य मैदानाची निवड करणे.

-निवड केलेल्या मैदानाचा विकास आराखड्यानुसार विकास करणे.

-क्रीडा स्पर्धांना परवानगीसंदर्भात नियमावली तयार करून प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविणे.