शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या विकासावर आज महामंथन

By admin | Updated: September 11, 2016 01:56 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाने घेतलेल्या पुढाकारातून महापालिका व नासुप्रशी संबंधित प्रश्नांवर एका मंचावर एकत्रितपणे चर्चा होणार आहे.

नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाने घेतलेल्या पुढाकारातून महापालिका व नासुप्रशी संबंधित प्रश्नांवर एका मंचावर एकत्रितपणे चर्चा होणार आहे. नागपूरच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. या चर्चेत नागपूरच्या एकूणच प्रश्नांवर सखोल विचारमंथन होऊन उपाय योजनांचे अमृत बाहेर बाहेर पडेल व यातून नागपूरच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास हजारो नागपूरकरांनी व्यक्त केला आहे. आज रविवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता कामठी रोडस्थित ईडन ग्रीन्ज येथे आयोजित या एकदिवसीय महाचर्चेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. दुपारी ४ वाजता आयोजित समारोप सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. एकूण चार सत्रात नागपूर शहरातील नागरी प्रश्न, समस्या, योजनाबद्ध विकासाची आवश्यकता, नागपूर मेट्रो व पायाभूत विकास, भविष्यातील आव्हाने, मनपा-नासुप्र व नागरिकांची जबाबदारी आदी विषयांवर चर्चा होईल. लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ मार्गदर्शक, उद्योगपती यांच्यासह मान्यवर शहरातील विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करून उपाय सुचवतील. आॅरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) च्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. नागपूरकर एकीकडे मेट्रो रेल्वे, स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहत आहेत तर दुसरीकडे रस्ते, पाणी, गटार, स्वच्छता, उद्यान, झोपडपट्टी, पार्किंग, सार्वजनिक परिवहन व्यवस्था, सार्वजनिक शौचालय यासारखे अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत. लोकमतने जनतेच्या मनातील हे प्रश्न ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन २०२० (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन)’ या महाचर्चेच्या माध्यमातून मांडण्याची घोषणा केली तेव्हा नागपूरकरांनी लोकमतचे भरभरून कौतुक केले. हजारोंच्या संख्येने लोकमतला ई-मेल, व्हॉट्स अ‍ॅप, फोन करून तसेच पत्राद्वारे आपल्या समस्या मांडल्या व सूचनाही केल्या. जनतेने मांडलेल्या या प्रश्नांवर लोकमतच्या महाचर्चेत सखोल मंथन होणार असून या प्रश्नांचे समाधान शोधण्याचा प्रयत्नही होणार आहे. लोकमत खऱ्या अर्थाने जनतेचा आवाज बुलंद करणार आहे.