शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

कृषीक्षेत्राच्या विकासाला प्राधान्य हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:44 IST

देशाचा विकास म्हणजे केवळ शहरांची प्रगती असा होत नाही. औद्योगिक विकास आवश्यक आहेच. मात्र शेतीवरदेखील लक्ष केंद्रीत करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू : ‘अ‍ॅग्रोव्हीजन’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचा विकास म्हणजे केवळ शहरांची प्रगती असा होत नाही. औद्योगिक विकास आवश्यक आहेच. मात्र शेतीवरदेखील लक्ष केंद्रीत करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कृषी विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर, खा.कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. मात्र शेतकºयांच्या प्रश्नांना योग्य तसे प्राधान्य मिळाले नाही. आजच्या तारखेत शेतकºयांवर निर्यातीसंदर्भात अनेक बंधने आहेत. ही बंधने हटविण्याची आवश्यकता आहे. दीनदयाल उपाध्याय यांनी ‘हर खेत को पानी’ असे म्हटले होते. त्यानुसार धोरण तयार झाले पाहिजे, असे उपराष्ट्रपतींनी प्रतिपादन केले. शेतकºयांच्या प्रगतीसाठी केवळ शासनच जबाबदार असते असे नाही. ही प्रवृत्ती राजकारण्यांमुळे वाढली आहे. प्रगतीसाठी समाज, सरकार, बँका, तंत्रज्ञान यांच्यासह विविध क्षेत्रांतून एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून शेतकरी विकसित होतील, असे उपराष्ट्रपती म्हणाले. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले.लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचा विकास म्हणजे केवळ शहरांची प्रगती असा होत नाही. औद्योगिक विकास आवश्यक आहेच. मात्र शेतीवरदेखील लक्ष केंद्रीत करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कृषी विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर, खा.कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. मात्र शेतकºयांच्या प्रश्नांना योग्य तसे प्राधान्य मिळाले नाही. आजच्या तारखेत शेतकºयांवर निर्यातीसंदर्भात अनेक बंधने आहेत. ही बंधने हटविण्याची आवश्यकता आहे. दीनदयाल उपाध्याय यांनी ‘हर खेत को पानी’ असे म्हटले होते. त्यानुसार धोरण तयार झाले पाहिजे, असे उपराष्ट्रपतींनी प्रतिपादन केले. शेतकºयांच्या प्रगतीसाठी केवळ शासनच जबाबदार असते असे नाही. ही प्रवृत्ती राजकारण्यांमुळे वाढली आहे. प्रगतीसाठी समाज, सरकार, बँका, तंत्रज्ञान यांच्यासह विविध क्षेत्रांतून एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून शेतकरी विकसित होतील, असे उपराष्ट्रपती म्हणाले. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले.तर शेतकरी कर्जमाफी मागणार नाहीयावेळी उपराष्ट्रपतींनी शेतकºयांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींवरदेखील प्रकाश टाकला. जर पुरेसे पाणी, सिंचन, २४ तास वीज, चांगले रस्ते, बाजारपेठा आणि तंत्रज्ञानाची ओळख शेतकºयांना करून दिली तर एकही शेतकरी कर्जमाफी मागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्जमाफी हे शेतकºयांच्या समस्येवरील समाधान नाही. कृषीक्षेत्रातील संशोधनदेखील वाढायला हवे. शिवाय शेतकºयांनीदेखील पारंपरिक प्रणाली व पिकांपासून थोडा वेगळा विचार करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.मराठीतून भाषणाची सुरुवातउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा नागपूरशी जुना संबंध राहिला आहे. सक्रिय राजकारणात असतानादेखील त्यांनी अनेकदा नागपूरला भेट दिली होती. शुक्रवारी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच मराठीतून करत उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय त्यांनी रटाळ भाषण न करता महत्त्वाच्या मुद्यांवर भर दिला.