शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

विध्वंसक घटनांना जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत

By admin | Updated: December 27, 2014 03:07 IST

देशात घडत असलेल्या विध्वंसक घटनांना व्यक्तीच्या जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या भारतीय दर्शन....

नागपूर : देशात घडत असलेल्या विध्वंसक घटनांना व्यक्तीच्या जीवनातील अपरिपूर्णता कारणीभूत आहे, असे मत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या भारतीय दर्शन विभागाचे अधिष्ठाता डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी व्यक्त केले.सोमलवार अ‍ॅकेडमी एज्युकेशन सोसायटीच्या ६० व्या संस्थापक दिन कार्यक्रमात शुक्रवारी त्यांचे ‘शिक्षणातून परिपूर्णतेकडे’ विषयावर व्याख्यान झाले. संस्थेचे संस्थापक गोविंद काशीनाथ उपाख्य अण्णासाहेब सोमलवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी संस्थापक दिन साजरा करण्यात येतो. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मधुकर सोमलवार व्यासपीठावर उपस्थित होते.आजच्या काळात इंटरनेटवर माहितीचा महासागर उपलब्ध आहे. हे ज्ञान व्यक्तीला नोकरी मिळवून देत असले तरी जीवनाला परिपूर्ण करण्यात मात्र मागे पडत आहे. विध्वंसक घटनांना ही बाब कारणीभूत आहे, असे ते म्हणाले.वैदिक काळातील शिक्षण पद्धतीमध्ये केवळ प्रशिक्षण नव्हते. त्यावेळी माणसे घडविण्याचे कार्य होत होते. आज विविध प्रकारची विद्या उपलब्ध आहे. यातील एक विद्या शिकण्यासाठी एक जन्म अपुरा पडू शकतो. परंतु, यापैकी एकही विद्या जीवन परीपूर्ण करू शकत नाही. जीवनाला परीपूर्ण करू शकेल तेच शिक्षण घेतले पाहिजे. जीवनाच्या परिपूर्णतेशिवाय कोणत्याही ज्ञानाला महत्त्व नाही. आपण बॉम्ब, वाहने, संगणक तयार करायला शिकलो, पण स्वत:वर संयम ठेवण्याची कला आपल्याला आजही येत नाही, अशी खंत पेन्ना यांनी व्यक्त केली. भारत ज्ञानाच्या आनंदात रमणारा देश आहे. जगातील पहिला ग्रंथ वेद भारतात लिहिला गेला. भारतातील ज्ञानच जगाला योग्य मार्ग दाखवू शकतो हे अनेकांनी मान्य केले आहे, असेही पेन्ना यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चौकाचे सौंदर्य वाढलेनागपूर : तुकडोजी पुतळा चौकाकडून छोटा ताजबागकडे जाणाऱ्या रस्ता दुभाजकावर वृक्षारोपण करण्यात आल्याने या चौकाच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे. या सोबतच अजनी पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर वृक्षारोपण करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)