शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

उपनिबंधकाने मागितले २१ लाख

By admin | Updated: July 14, 2016 02:58 IST

२१ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या उप-निबंधकास बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. महेंद्र भाऊसाहेब मगर (४४) रा. निर्मलनगरी,...

लाच मागितल्याप्रकरणी अटक : एसीबीच्या कारवाईने अधिकारी हादरले नागपूर : २१ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या उप-निबंधकास बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. महेंद्र भाऊसाहेब मगर (४४) रा. निर्मलनगरी, भांडे प्लॉट चौक असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. मगर हे रघुजीनगर येथे दुय्यम उपनिबंधक कार्यालयात उपनिबंधक आहे. तक्रारकर्ता राजेश काकडे हे माँ सर्वमयी नागरी सहकारी पत संस्थेचे व्यवस्थापक आणि जॉर्इंट मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष आहेत. केंद्रीय सहकार आयुक्त, दिल्ली यांच्यातर्फे सहकार विभागाला पंतसंस्थांची चौकशी करण्यासंबंधी दिशा-निर्देश वेळोवेळी जारी केले जातात. या आधारावर मगरने दोन्ही पतसंस्थेच्या कारभाराची चौकशी केली. मगरने काकडे यांना दोन्ही संस्थेच्या कारभारात अनियमितता असल्याचे सांगितले. तसेच सर्व संचालकांच्या विरोधात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या धमकीमुळे काकडे व इतर संचालक घाबरले. दोन्ही पतसंस्थेमध्ये ३० संचालक आहेत. मगरने प्रत्येक संचालकाकडून ३ लाख रुपये याप्रमाणे ९० लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. काकडे यांनी ५ -६ संचालक नसल्याचे सांगितल्यावर ७८ लाख रुपये मागू लागला. पैसे न दिल्यास कारवाईसाठी तयार राहण्यासही सांगितले. सहावेळा फसला ट्रॅप नागपूर : एप्रिल ते मे महिन्यादरम्यान काकडे आणि मगर यांच्यात बोलणे सुरू होते. हो-नाही करीत २१ लाख रुपयावर मगर अडून बसला. काकडे यांनी यासंदर्भात एसीबीकडे तक्रार केली. यानंतर त्याला रंगेहात पकडण्यासाठी एसीबीने योजना आखली. ठरलेल्या योजनेनुसार एसीबीने मगरला पकडण्यासाठी ५ ते ६ वेळा जाळे पसरविले. परंतु तो खूप तरबेज निघाला. तो काकडेला कधी यायचे म्हणून वेळच सांगत नव्हता. अचानक मगर काकडेला भेटू लागला. परंतु काकडे यांनी पैसे दिले नाही. पुन्हा त्याने भेटणे बंद केले. तसेच फोनवरही बोलण्याचे टाळले. मागील दोन महिन्यांपासून हा खेळ सुरू होता. अखेर एसीबीने बुधवारी मगरला अटक करून सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अटकेनंतर लगेच मगरच्या भांडेप्लॉटस्थित घरी आणि पुणे येथील निवासस्थानावर धाड टाकण्यात आली. नागपूरच्या घरी काहीच आक्षेपार्ह सापडले नाही, तर पत्नी बाहेरगावी गेली असल्याने पुणे येथील घराला सील करण्यात आले. मगर मूळचा पुणे येथील रहिवासी आहे. सात महिन्यांपूर्वी नागपूरला बदली झाली. तेव्हापासून तो सक्करदरा येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात तैनात होता. जिल्ह्यात ८२५ सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. त्यांच्या कामकाजाची देखभाल दुय्यम उपनिबंधक कार्यालयाद्वारे केली जाते. मगरच्या अधिकार क्षेत्रात अडीचशे पतसंस्था येतात. अधिकांश पतसंस्थांमधील कामकाजात काही त्रुटी असतात. याचा लाभ घेऊन वसुली केली जाते. काकडेला धमकावल्यानंतर मगर दुसऱ्या संस्थेच्या मागे लागला होता. ही कारवाई अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मोहन सुगंधी, निरीक्षक मोनाली चौधरी, हवालदार भानुदास गीते आणि चंद्रशेखर ढोक यांनी केली. (प्रतिनिधी)