शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
3
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
4
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
5
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
6
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
7
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
8
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
9
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
10
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
12
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
13
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
14
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
15
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
16
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
17
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
18
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
19
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
20
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?

शिक्षकांच्या समायोजनास शाळांचा नकार

By admin | Updated: December 5, 2014 00:41 IST

राज्यातील अनुदानित शाळांमधील सर्व अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन त्वरित करावे, असे निर्देश शासनाने जारी केले आहेत. परंतु नागपूर जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी शासनाच्या

शिक्षक संघटना आक्रमक : अधिवेशनात गाजणार मुद्दानागपूर : राज्यातील अनुदानित शाळांमधील सर्व अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन त्वरित करावे, असे निर्देश शासनाने जारी केले आहेत. परंतु नागपूर जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. शिक्षकांमध्ये या मुद्यावरून प्रचंड संतापाची भावना आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर शिक्षक आमदार व शिक्षक संघटना हा प्रश्न लावून धरणार आहेत. याची दखल घेत समायोजनास नकार देणाऱ्या शाळांची मान्यता काढण्याच्या हालचाली शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन केले जाईल शिवाय यापुढे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात येणार नाही, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच दिले. शिक्षण आयुक्तांनी यासंबंधीचे आदेशदेखील काढले व नागपूर जिल्ह्यातील २७४ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेला सुरुवातदेखील झाली. शिक्षण विभागाच्या संबंधित शिक्षकांना कुठल्या शाळेत समायोजित करण्यात येत आहे याची यादीदेखील जारी केली. अनेक शिक्षकांना तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या शाळांमधून कार्यमुक्तदेखील करण्यात आले. परंतु ज्या शाळेत समायोजित करण्यात आले आहे तेथे शिक्षण विभागाचे पत्र घेऊन गेल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. अनेक शाळांनी संबंधित कर्मचाऱ्यांना समायोजित करण्यास नकार दिला. तर काही शाळा शिक्षण विभागाकडून अद्याप समायोजनाचा आदेशच मिळाला नाही, असे कारण देऊन टाळाटाळ करीत आहेत. काही शाळांनी तर शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासदेखील नकार दिला आहे. यात शहरातील अनेक नामवंत शाळांचादेखील समावेश आहे. अतिरिक्त ठरलेले शिक्षक समायोजनासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिक्षण विभागाच्या चकरा मारत आहेत. परंतु त्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. आतापर्यंत केवळ ४२ शिक्षकांचे समायोजन झाले आहे. (प्रतिनिधी)...तर शाळांची मान्यता रद्द- शिक्षणाधिकारी जर शाळांनी समायोजनासंबंधीच्या शासननिर्देशांचे पालन केले नाही तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुढे यांनी दिला आहे. सर्व अतिरिक्त शिक्षकांनी समायोजित शाळांमध्ये त्वरित रुजू व्हावे. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे. शिक्षकांना रुजू करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुख्याध्यापकांच्या पदाची मान्यता काढण्यात येईल. तसेच शाळेचीही मान्यता काढण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही शिक्षणाधिकारी गुढे यांनी सांगितले. आमच्याकडे शिक्षक समस्या मांडत आहेत व त्यांचे निराकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे असेही ते म्हणाले.वेतनाचे काय?जुन्या शाळेतून घेतलेली कार्यमुक्ती अन् समायोजित शाळेने रुजू करण्यास दिलेला नकार यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. वेतन नेमके कुठल्या शाळेच्या आस्थापनेवरून निघेल असा प्रश्न त्यांना पडला आहे. आमच्याकडेच अतिरिक्त शिक्षक होण्याची शक्यता असल्याने शिक्षण विभागाच्या निर्देशांचे पालन कसे करायचे असा प्रश्न शाळांनी उपस्थित केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कार्यमुक्तीचे पत्र घेतल्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आठ दिवसांच्या आत नवीन शाळांमध्ये रुजू व्हायची अट शिक्षण विभागाने टाकली आहे.