शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा ‘डंख’ करतोय मुलांना बेजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर नागरिकांनी जरासा उसासा घेतला असला तरी आजघडीला अनेक कुटुंबातील सदस्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर नागरिकांनी जरासा उसासा घेतला असला तरी आजघडीला अनेक कुटुंबातील सदस्यांना डेंग्यूचा डंख भेडसावत आहे. विशेषत: यामध्ये मुलांची संख्या अधिक आढळत असून, डेंग्यूचा आजार मुलांना बेजार करीत आहे.

उमरेड शहरात शंभरावर खासगी रुग्णालये आहेत. यापैकी बहुतांश रुग्णालयात दिवसभरात डझनभर डेंग्यू रुग्ण उपचारांसाठी येत आहेत. मागील काही आठवड्यांपासून ही रुग्णसंख्या वाढतीवर असून शहरासह गावखेड्यातील रुग्णसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत.

नागरिकांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि नंतरही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. या दुर्लक्षितपणामुळेसुद्धा यंदा मागील काही वर्षांनंतर डेंग्यूचा आजार चांगलाच बोकाळलेला दिसत आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी. विशेषत: अंगदुखी, थंडी लागून ताप येणे, अशक्तपणा जाणवत असल्यास वेळीच औषधोपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन केले जात आहे. नगरपालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर फाॅगिंग मशीनद्वारे धुरळणी सुविधा उपलब्ध करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.