शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मानवी भावभावनांचे क्षण पकडणारे प्रदर्शन

By admin | Updated: August 23, 2015 03:04 IST

आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आपल्या हातून निसटून जातो. कारण काळ नेहमी समोरच जातो.

नागपूर : आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आपल्या हातून निसटून जातो. कारण काळ नेहमी समोरच जातो. पण आयुष्यात अनेक घटना आपल्या लक्षात राहतात. त्या मानसिक आणि भावनिक पातळीवर असतात. एखादा क्षण पकडता आला तर...मस्तीचा, आनंदाचा, मित्रमैत्रिणींच्या एकत्रित असण्याचा, आपल्या प्रियजनांच्या खळखळून हसण्याचा, बाळाच्या पहिले पाऊल टाकण्याचा, त्याच्या शाळेचा पहिला दिवस आणि असे कितीतरी क्षण. हो हा क्षण बांधून ठेवता येतो, पकडून ठेवता येतो. ही किमया साधते ती छायाचित्रामुळेच. मानवी भावभावनांचे अप्रतिम छायाचित्रे असलेले प्रदर्शन म्हणजे स्मरणरंजनाचा अनोखा सोहळाच. जवाहरलाल आर्ट गॅलरीत आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्यावतीने २० वे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त या प्रदर्शनात दोन गट ठेवण्यात आले. त्यात व्यावसायिक फोटोग्राफर्स आणि हौशी छायाचित्रकार असे गट होते. व्यावसायिक गटासाठी आनंद हा विषय ठेवण्यात आला आणि हौशी गटासाठी विषयाचे बंधन नव्हते. या प्रदर्शनाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद सध्या मिळतो आहे. आनंदालाही अनेक स्तर असतात, अनेक छटा असतात, ही भावना नेमकेपणाने पकडण्याचा प्रयत्न व्यावसायिक छायाचित्रकारांनी मोठ्या कौशल्याने केला आहे. या छटा हौशी चित्रकारांनी नेमकेपणाने कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. यात वन्यप्राणी, निसर्ग, मानवी चेहरे यातून विरह, उत्कटता, आनंद, वेदना अशा भावना जिवंत केल्या आहेत. हे प्रदर्शन २३ आॅगस्टपर्यंत रसिकांसाठी खुले आहे. हे प्रदर्शन आणि स्पर्धेसाठी जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले. चेतन जोशी, दिनेश मेहर, रमाकांत झाडे, प्रदीप निकम, अविनाश लोंढे, राजन गुप्ता, जयेश वासानी, सुनील पिंपळापुरे, सुनील इंदाणे आदींनी सहकार्य केले.