शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

‘डेल्टा प्लस’चा अंदाज खोटा ठरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:11 IST

सुमेध वाघमारे नागपूर : ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’हा वेगाने पसरत असल्याने केंद्र सरकारने 'विषाणूचा चिंताजनक प्रकार' घोषित केले आहे. परंतु ...

सुमेध वाघमारे

नागपूर : ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’हा वेगाने पसरत असल्याने केंद्र सरकारने 'विषाणूचा चिंताजनक प्रकार' घोषित केले आहे. परंतु राज्यात आढळून येत असलेले याचे रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा विचार केला असता या विषाणूचा प्रकाराबाबतचा अंदाज खोट ठरला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तज्ज्ञाच्या मते, या विषाणूचा आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे.

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताच आता डेल्टा प्लस कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचे कारण ‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट’ असण्याची शक्यता बोलली जात आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे मुंबई ७, पुणे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी १ रुग्ण आहे. विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांचा अहवाल एक महिन्यानंतर आता प्राप्त झाला आहे. बहुसंख्य रुग्ण ठणठणीत झाले आहेत. यामुळे विषाणूच्या या प्रकाराबाबत चिंतेचे कारण नसल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

-विदर्भातील चारही रुग्णांकडून संसर्ग नाही

विदर्भात आढळून आलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या चारही रुग्णांकडून संसर्ग झाला नसल्याचे समोर आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व सालेकसा तालुक्यात व अकोला जिल्ह्यामध्ये आढळून आलेला ‘डेल्टा प्लस’चा रुग्णाला सौम्य लक्षणे होती. या तिन्ही रुग्णांनी घरीच राहून उपचार घेतला. हे तिन्ही रुग्ण बरे झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ‘डेल्टा प्लस’चा रुग्णाला मध्यम लक्षणे होती. यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आठवड्याचा उपचारानंतरच रुग्ण बरा झाला. हे सर्व रुग्ण जून महिन्यातील आहेत. या चारही रुग्णांकडून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना संसर्ग झाला नसल्याचे समोर आले आहे. आता त्यांच्या कुटुंबाचा सदस्यांचे नमुने ‘जिनोम सिक्वेंसिंग’साठी पाठविले जाणार आहे.

-कोरोना विषाणूचा बदलेला प्रकार

कोरोनाचा दुसऱ्या लाटेत अत्यंत संक्रामक प्रकार ‘बी .१.६१७.२’ने कहर केला होता. याला ‘डेल्टा’ नाव दिले आहे. आता हा ‘ए व्हाय.१’ या ‘डेल्टा प्लस’मध्ये बदललेला आहे. ‘डेल्टा’पेक्षा ‘डेल्टा प्लस’ हा वेगाने पसरतो, यावर ‘मोनोक्लोनल अ‍ँटिबॉडी’ उपचाराद्वारेदेखील नियंत्रित केले जाऊ शकत नाही, असे बोलले जात होते. परंतु आता पुन्हा यावर विचार केला जात आहे.

-‘डेल्टा’चा तुलनेत ‘डेल्टा प्लस’ कमी धोकादायक

, ‘डेल्टा’च्या तुलनेत ‘डेल्टा प्लस’ हा कमी धोकादायक आहे. तसा ‘डाटा’ ‘आयसीएमआर’कडे उपलब्ध आहे. आतापर्यंत जे रुग्ण ‘डेल्टा प्लस’ने बाधित झाले त्यांच्याकडील माहितीवरून ‘डेल्टा’पेक्षा हा कमी संसर्गाचा असल्याचे पुढे आले आहे. यामुळे ‘डेल्टा प्लस’ला घाबरण्याचे कारण नाही. नवे ‘व्हेरियंट’ येतच राहणार आहे. यावर लसीकरणासोबतच ‘जिनोम सिक्वेसिंग’ करीत अभ्यास सुरू ठेवणे हाच उपाय आहे.

-डॉ. नितीन शिंदे, संसर्गजन्य आजारतज्ज्ञ