शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

दीपक बजाज यांचा जामीन फेटाळला

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधीची अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक ...

विशेष न्यायालय : कोट्यवधीचे अपसंपदा प्रकरणनागपूर : भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधीची अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाज यांचा जामीन अर्ज शुक्रवारी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ सप्टेंबर २०१५ रोजी दीपक बजाज आणि त्यांच्या पत्नी वीणा बजाज यांच्याविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ड) (ई), १३ (२) आणि भादंविच्या ४०६, ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामिनाची लढाई हरल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने एसीबीकडे शरण जाण्याचा आदेश दिल्याने दीपक बजाज यांनी १२ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांपुढे शरणागती पत्कारली होती. त्यानंतर त्यांना रीतसर अटक करण्यात आली होती. एसीबीने दीपक बजाज यांचा एकूण १३ दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेतलेला आहे. सध्या ते कारागृहात न्यायालयीन कोठडी रिमांडमध्ये आहेत. बजाज यांच्या जामीन अर्जावर बचाव आणि सरकार पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.प्रकरण गंभीर असल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे, अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे यांनी तर आरोपीच्या वतीने ज्येष्ठ वकील अ‍ॅड. सुनील मनोहर, अ‍ॅड. कैलाश डोडानी, अ‍ॅड. अक्षय नाईक, अ‍ॅड. कमल सतुजा यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)पहिल्याच घर झडतीत आढळले १८ लाखडॉ. दीपक बजाज यांनी गैरमार्गाने जमवलेली अपसंपदा त्यांचे जरीपटका के.सी. बजाज मार्गावरील महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूल परिसरातील साईकृपा या प्रिन्सिपल बंगलोमध्ये ठेवलेली आहे, अशा गुप्त माहितीच्या आधारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजीव जैन यांनी न्यायालयाकडून रीतसर घरझडती वॉरंट प्राप्त करून आपल्या पथकासह २४ सप्टेंबर २०१५ रोजी धाड घातली होती. घर झडतीत १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख आढळून आले होते. या रकमेपैकी १६ लाख ९० हजार ९७८ रुपये बजाज यांच्या घरी, १ लाख ५ हजार ५५० रुपये संस्थेच्या लिपीक कार्यालय आणि स्टाफ रुममधून आणि १८ हजार ९४० रुपये वीणा बजाज यांच्या कार्यालयातून जप्त करण्यात आले होते. या अपसंपदेबाबत बजाज यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. पदाचा दुरुपयोग, तीन कोटी मिळवलेदीपक बजाज हे सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि त्यांच्या पत्नी वीणा बजाज ह्या अध्यक्षा आहेत. मुलगी डिम्पी बजाज ही सहायक शिक्षिका आहे. दीपक बजाज यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ३ कोटी १० लाख ५५ हजार १४६ रुपये प्राप्त केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी १ कोटी ५६ लाख ७ हजार १२८ रुपये विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य डोनेशन घेऊन आणि भ्रष्ट मार्गाने शिक्षकांच्या नेमणुका करण्यात प्राप्त करण्यात आलेले आहे.