हिंगणा : इसासनी (ता. हिंगणा) येथे बांधण्यात समाजभवन आणि सभामंडपाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून, या वास्तूंचे आ. समीर मेघे यांच्या हस्ते लाेकर्पण करण्यात आले. साेबतच वाॅर्ड क्रमांक-४ मधील चाैरस्त्याचे नामकरण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य अर्चना गिरी, माजी जिल्हा परिषद सदस्य अंबादास उके, धनराज आष्टनकर, डिगडोहचे उपसरपंच कैलास गिरी, दादाराव मसराम, अनिल सिंग, चंद्रशेखर राऊत, रामकिशोर अतीरवार, दिनेश राऊत, लीलाधर पटले, ग्रामपंचायत सदस्य प्रीती राऊत, सुरेश ठाकरे, सुनीता वाणी, भरत गायधने, दमयंती पारधी, मनीष भेंडारकर, दमदेव सहारे, सतेंद्र मधावी, प्रमोद दुबे, पवन बिसेंद्रे, भोजराज बारबुडे, धनराज शरणागत, राजेश झा, सोहित यादव, नीतेश कटरे, देवदास कावरे, राम पटले, कैलास नागपुरे, राजेंद्र हरीणखेडे, ओंकार पटले, संगीता भेंडारकर, सत्त्वशीला नागपुरे, कल्पना झा, मोनिका दुबे, राजकुमारी मडावी, सुनीता बाळबुधे उपस्थित होते.