शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांचे मृत्यू कमी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:08 IST

सावनेर/काटोल/कामठी/उमरेड/कळमेश्वर/कुही/मौदा/रामटेक/मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. सोमवारी मध्यरात्री आलेल्या अहवालानुसार, ग्रामीण भागात २,४६६ नवीन ...

सावनेर/काटोल/कामठी/उमरेड/कळमेश्वर/कुही/मौदा/रामटेक/मौदा/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. सोमवारी मध्यरात्री आलेल्या अहवालानुसार, ग्रामीण भागात २,४६६ नवीन रुग्णांची भर पडली तर ३९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ग्रामीण भागात बाधितांची एकूण संख्या १,०३,६८९ झाली आहे. यातील ७१,८७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर १७४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काटोल तालुक्यात ५४७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ३२ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे. नरखेड तालुक्यात ६९ रुग्णांची नोंद झाली. यात नरखेड शहरातील १८ तर ग्रामीण भागातील ५१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २,३६७ तर शहरात ४८५ झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावअंतर्गत येणाऱ्या गावात (८), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (१७), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (२) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात २४ रुग्णांची भर पडली. रामटेक तालुक्यात १८२ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ४७ व ग्रामीण भागातील १३५ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५,५०९ इतकी झाली आहे. यातील ३,३२५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २,१८४ इतकी आहे.

कुही तालुक्यातील विविध केंद्रांवर ३७२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३,२९२ इतकी झाली आहे. मंगळवारी कुही शहर आणि परिसरात (९), मांढळ (४), वेलतूर (७), साळवा (६) तर तितूर येथे ९ रुग्णांची नोंद झाली.

कळमेश्वर तालुक्यात १०९ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रात १९ तर ९० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक हरदोली येथे १६ तर गोंडखैरी येथे १४ रुग्णांची नोंद झाली.

उमरेड तालुक्यात ५७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ५२ तर ग्रामीण भागातील ५ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ६५४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मौदा तालुक्यात ३४ रुग्णांची भर पडली तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या २,८०८ इतकी झाली आहे. यातील १९०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ८४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हिंगणा तालुक्यात बाधितांची संख्या १० हजारावर

हिंगणा तालुक्यात ८४० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील ४५, कान्होलीबारा व हिंगणा प्रत्येकी (११), इसासनी (८) रायपूर, डिगडोह प्रत्येकी ५, कवडस (४), मोंढा, उखळी, किन्ही धानोली, चिंचोली पठार, नीलडोह व टाकळघाट प्रत्येकी २, सुकळी गुपचूप, देवळी पेंढरी, डिगडोह पांडे, उमरी वाघ, खैरी पन्नासे व गिरोला येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यातील बाधितांची संख्या १०,१०० इतकी झाली आहे. यातील ६,१२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर १९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.