शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बिबट्याचा अपघातात मृत्यू

By admin | Updated: March 28, 2015 00:06 IST

खिंडवाडीजवळ दुर्घटना : महामार्गावर पहाटे अज्ञात वाहनाने उडविले

सातारा : दुर्मीळात दुर्मीळ मानला जाणारा काळा बिबट्या शुक्रवारी पहाटे महामार्गावर खिंडवाडीजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडला. हा बिबट्या नर जातीचा असून, अंदाजे २३ महिने वयाचा असल्याचे माहितगारांनी सांगितले. खिंडवाडी हे साताऱ्याचे प्रवेशद्वार असून, तेथेच बिबट्याचा अपघातात मृत्यू होण्याची घटना सव्वा वर्षात दुसऱ्यांदा घडली आहे. पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या किंवा पाण्याच्या शोधात हा बिबट्या महामार्ग ओलांडून गेला असावा आणि अज्ञात वाहनाने त्याला पाठीमागून धडक दिली असावी, असा अंदाज आहे. धडक बसल्यावरही काही अंतर तो कसेबसे चालत गेला असावा आणि नंतर महामार्गाकडेला खोदलेल्या चरीत तो पडला असावा, असे दिसून आले. बिबट्याला कोठेही जखम झाली नव्हती, की रक्तही नव्हते. पाठीचे मणके निसटले असावेत, तसेच खुब्याचे हाड मोडले असावे, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. साताऱ्याजवळ शुक्रवारी पहाटे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या काळ्या बिबट्याला शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले असता वन कर्मचाऱ्यांसह इतरांनाही मोबाईलवर त्याचे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.