शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

५५ दिवसात रेफर झालेल्या ८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारत असल्यास ठीक, गंभीर होत असल्यास मेडिकलला पाठव, अशी काहीशी वृत्ती खासगीसह इतर ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारत असल्यास ठीक, गंभीर होत असल्यास मेडिकलला पाठव, अशी काहीशी वृत्ती खासगीसह इतर जिल्हा व सामान्य रुग्णालयांची आहे. परिणामी, मेडिकलमध्ये मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. ५५ दिवसामध्ये ‘रेफर’ होऊन मेडिकलमध्ये आलेल्या ८१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. याची चौकशी होण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय, या रुग्णांमुळे व त्यांच्या नातेवाईकांकडून नागपूर जिल्ह्यात कोरोना तर वाढत नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच मेडिकलमध्ये ६०० खाटांचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले. त्यावेळी रुग्णांची संख्या कमी होती. परंतु रुग्ण वाढताच जिल्ह्यास्तरावरही कोविड हॉस्पिटल, तहसीलस्तरावर कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. शहरात खासगी कोविड हॉस्पिटलची संख्या वाढवून ती ९० वर नेण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. यामुळे शासकीयसह खासगी रुग्णालये फुल्ल झाली होती. परंतु ऑक्टोबरपासून कोरोनाची गती मंदावली. डिसेंबर व जानेवारी महिन्यात अनेक खासगी कोविड इस्पितळातील ९० टक्के खाटा रिकाम्या झाल्या. असे असताना कोरोनाचे गंभीर झालेले रुग्ण मेडिकलमध्ये पाठविणे सुरूच आहे. कोरोनावर औषधोपचार नाही. आतापर्यंतचा अनुभव व आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उपचार केला जात आहे. हाच उपचार इतरही कोविड रुग्णालयात उपलब्ध असताना गंभीर स्थितीतील रुग्ण मेडिकलमध्ये पाठविले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

-खासगी हॉस्पिटलमधून रेफर रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण मोठे

मागील दोन महिन्यात शहरातील विविध खासगी हॉस्पिटलमधून २९ रुग्णांना मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. विशेष म्हणजे, खासगीमध्ये ऑक्सिजनपासून ते आयसीयूची सोय असताना गंभीर रुग्णांना मेडिकलला पाठविले जात आहे. यात प्रवासादरम्यान रुग्ण आणखी गंभीर होत असल्याने मृत्यूचे प्रमाण मोठे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामागे हॉस्पिटलमधील मृत्यूदर कमी दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

- भंडाऱ्यातून ११ तर अमरावतीमधून आले ५ रुग्ण

१६ डिसेंबर ते ९ फेब्रुवारी यादरम्यान भंडारा जिल्ह्यातून ११, अमरावती जिल्ह्यातून पाच, यवतमाळ जिल्ह्यातून दोन, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून प्रत्येकी चार, गडचिरोली जिल्ह्यातून तीन, वर्धा जिल्ह्यातून दोन तर नाशिकमधून एका रुग्णाला मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले. उपचारादरम्यान या सर्व रुग्णांचा मृत्यू झाला.

- मध्य प्रदेशातील १० रुग्ण

५५ दिवसात मध्य प्रदेशातून १० तर नागपूर ग्रामीण भागातून १० रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. तज्ज्ञानुसार, यातील अनेकांची प्रवासादरम्यान ऑक्सिजनची पातळी योग्य राखली गेली नव्हती. त्यापूर्वी त्यांच्यावर योग्य उपचारही झाले नसल्याने मेडिकलमध्ये अशा रुग्णांचे २४ ते ४८ तासात मृत्यूचे प्रमाण मोठे होते.

- रेफर केलेले ठिकाण व रुग्णसंख्या

खासगी हॉस्पिटल : २९

नागपूर ग्रामीण : १०

मध्य प्रदेश : १०

भंडारा : ११

अमरावती : ५

गोंदिया : ४

चंद्रपूर : ४

गडचिरोली : ३

यवतमाळ : २

वर्धा : २