शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मृत सुवर्णा न्यायवंचितच

By admin | Updated: September 2, 2016 02:46 IST

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदमारी रस्त्यावर टाटा सुमो अंगावर घालून सुवर्णा सुरेश माळी या ३३ वर्षीय महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता.

भरकटलेला पोलीस तपास : सुमो अंगावर घालून खुनाचे प्रकरण, आरोपी पती पोलीस कॉन्स्टेबल निर्दोषराहुल अवसरे नागपूरनंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदमारी रस्त्यावर टाटा सुमो अंगावर घालून सुवर्णा सुरेश माळी या ३३ वर्षीय महिलेचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. भरकटलेला पोलीस तपास, शिवाय दोन सख्ख्या बहिणीच फितूर झाल्याने सबळ पुराव्यां अभावी संशयाचा लाभ मिळून आरोपी पती पोलीस कॉन्स्टेबल न्यायालयात निर्दोष ठरला. त्यामुळे मृत सुवर्णा न्यायवंचितच राहिली. सुरेश सदाशिव माळी, असे आरोपीचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो नंदूरबार पोलीस दलात शिपाई होता आणि तळोदा पोलीस ठाण्यात तैनात होता. खटल्याची पार्श्वभूमी अशी, भांडेवाडी भागात राहणारी पूर्वाश्रमीची सुवर्णा कैलास सोमकुंवर ही २००८ मध्ये मुंबईहून दादर एक्स्प्रेसने नागपूरला परतत असताना रेल्वे डब्यात तिची सुरेश माळीसोबत ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. २०१२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. सुरेश हा सुवर्णाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सुरेशचेही अन्य एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने दोघांमध्ये कडाक्याची भांडणे होत होती. त्यामुळे सुवर्णा माहेरी राहण्यास आली होती. ४ जुलै २०१४ रोजी सुरेशने मोबाईलवर संपर्क करून सुवर्णाला चांदमारी भागात बोलावले होते. त्या दिवशी रात्री ९ वाजताच्या सुमारास ती पारडीला जात असल्याचे सांगून सायकल घेऊन भांडेवाडी येथील भावाच्या घरून निघाली होती. चांदमारी मंदिराच्या भागात रस्त्यावर सुवर्णाच्या अंगावर टाटा सुमो घालून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. आरोपी पळून गेला होता. अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत महिलेचीही ओळख पटली नव्हती.तर भोसकल्याची जखम कशी ?नागपूर : तब्बल सात दिवसानंतर ११ जुलै २०१४ रोजी सुवर्णाचा भाऊ साहेबराव सोमकुवर, काका नरेश सोमकुवर, बहिणी ज्योतिका लोखंडे, सलिता सोमकुवर आणि शेषराव लोखंडे यांनी नंदनवन पोलीस ठाणे गाठून ओळख पटवली होती. साहेबराव कैलास सोमकुंवर यांनी आपल्या बयाणात संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी सुरेश माळी याला १४ जुलै २०१४ रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याने खुनाची कबुली दिली होती. लाल रंगाची एमएच-३५-२६५२ क्रमांकाची टाटा सुमो सुवर्णाच्या अंगावर घालून खून केल्याचे त्याने सांगितले होते. पोलिसांनी ही सुमो जप्त केली होती. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. हे प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होते. प्रकरण अंगावर टाटा सुमो घालून खुनाचे असतानाही शवविच्छेदन अहवालात इतर जखमांव्यतिरिक्त एका जखमेचा उल्लेख भोसकल्याची जखम असा होता. संशय निर्माण करणाऱ्या या जखमेचा उल्लेख आरोपपत्रात नव्हता. घटनास्थळापासून २०० मीटरवर सायकल पडलेली होती. ती जप्ती पंचनाम्यात दर्शविण्यात आली नव्हती. मृत सुवर्णाचा मोबाईलही जप्त करण्यात आला नव्हता. त्यामुळे सीडीआर आणि टॉवर लोकेशन पोलिसांना प्राप्त करताच आले नाही. गुन्ह्यासाठी वापरलेली टाटा सुमो पंचासमक्ष जळगाव मुक्ताईनगर येथून जप्त करण्यात आली होती. जप्ती पंचन्याम्यात नंदूरबार जिल्ह्याचा उल्लेख होता. तपास अधिकाऱ्याने आरोपीची प्रेयसी म्हणून एका तरुणीला साक्षीदार म्हणून हजर केले नव्हते. साक्ष देताना तिने चक्क नकार दिला होता. वास्तविक तिला आरोपी करायला हवे होते. मृत महिलेच्या दोन्ही बहिणींनी आणि बहीण जावयाने साक्ष देताना सरकार पक्षाला मदत केली नाही. ते न्यायालयात फितूर झाले. आरोपीसोबत सुवर्णाचे संबंध चांगले होते, असे त्यांनी साक्षीत सांगितले. एकूणच सबळ पुराव्यांअभावी आरोपी पोलीस शिपाई सुरेश माळी निर्दोष ठरला. न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)