शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जगात दुसऱ्यांदा फाशीनंतर शवपरीक्षण

By admin | Updated: July 31, 2015 02:39 IST

शेकडो निष्प्पापांचे बळी घेणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याला गुरुवारी सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.

पहिल्यांदाच मेडिकलच्या बाहेर शवपरीक्षण : न्यायवैद्यकशास्त्र विभागाने पार पाडल्या संपूर्ण जबाबदाऱ्यासुमेध वाघमारे नागपूरशेकडो निष्प्पापांचे बळी घेणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याला गुरुवारी सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. फाशीनंतर कारागृहातच त्याचे शवपरीक्षण करण्यात आले. जगात दुसऱ्यांदा आणि भारतात पहिल्यांदाच फाशीनंतर शवपरीक्षण करण्याची घटना घडली. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) न्यायवैद्यकशास्त्र विभागाने ही जबाबदारी पार पाडली. इंग्लंडमध्ये १८५५ मध्ये जॉर्ज केली याला फाशी देण्यात आली. फाशीनंतर जॉर्जचा मृतदेह दफन करण्यात आला होता. परंतु त्याच्या मृत्यूनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यावेळी न्यायवैद्यकशास्त्र हा स्वतंत्र विभाग नव्हता. म्हणून पॅथालॉजी विभागाच्या एका डॉक्टरने जॉर्जचे शवविच्छेदन केले. फाशीनंतर केलेले हे जगातील पहिले शवविच्छेदन होते. सूत्रानुसार याकूब मेमन याच्या फाशीनंतर शवपरीक्षणाची जबाबदारी मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाकडे आली तेव्हा विभागापुढे अनेक प्रश्न होते. भारतात यापूर्वी फाशी दिल्यानंतर शवपरीक्षण झालेले नव्हते. यातच सुप्रीम कोर्टाने शवपरीक्षणाची मार्गदर्शक तत्त्वे दिल्याने आणि पहिल्यांदाच मेडिकलच्या बाहेर शवपरीक्षण होणार असल्याने न्यायवैद्यकशास्त्र विभागाला अत्यंत कमी वेळात अनेक गोष्टींची तयारी करावी लागली.बुधवार रात्रीपासून तयारी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मेमनचे शवपरीक्षण मध्यवर्ती कारागृहातच करण्याचा निर्णय झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दोन बैठकी पार पाडल्या. यात आवश्यक साहित्यासोबतच जागा ठरविण्यात आली. बुधवारी रात्री मेडिकलच्या आकस्मिक विभागातून शवविच्छेदनाचे दोन टेबल अ‍ॅम्ब्युलन्समधून तर एक पोर्टेबल एक्स-रे मशीन व इतर साहित्य पोलिसांच्या वाहनातून कारागृहात आणण्यात आले, तर फाशीच्या दिवशी पहाटे ४ वाजता न्यूरोलॉजीची उपकरणे पोहचविण्यात आली.न्यायवैद्यकशास्त्र विभागासह इतर सहा विभागांचा सहभागमेमन याच्या शवपरीक्षणात मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह न्यूरोलॉजी, आॅर्थाेपेडिक्स, अ‍ॅनाटॉमी, रेडिओलॉजी व पॅथालॉजी विभागाचे प्रत्येकी एक डॉक्टर तर न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक) विभागाचे दोन डॉक्टर व एक तंत्रज्ञ असा नऊ जणांचा ताफा होता. प्रत्येक विभागाच्या तज्ज्ञानी आपले कार्य चोख केले.७.५५ वाजता मिळाला मेमनचा मृतदेहसूत्राने दिलेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे ७.५५ वाजता याकूब मेमनचा मृतदेह न्यायवैद्यकशास्त्र विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. फाशी यार्डपासून काही अंतरावर कापडी तंबूत शवपरीक्षणाची तयारी करण्यात आली होती. साधारण दीड तास हे शवपरीक्षण करण्यात आले. सव्वा तासात शवपरीक्षण!सुत्राच्या माहितीनुसार मेमेन याचा मृतदेह शवपरीक्षणासाठी सुमारे ७ वाजून ५५ मिनिटांनी मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभाग आणि त्यांच्या चमूच्या ताब्यात दिला. चमूला केवळ एक-दीड तासाचा वेळ दिला होता. यात शवपरिक्षणासह मृतदेह कुजू नये म्हणून रासायनिक प्रक्रिया करायचे होते. चमूने आपले अनुभव आणि कौशल्याच्या बळावर वेळेत शवपरिक्षण केले.