शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर अंधार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : नागपूर-जबलपूर (मध्य प्रदेश) हा राष्ट्रीय महामार्ग कामठी शहराच्या मध्यभागातून गेला आहे. शहरात या मार्गाच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : नागपूर-जबलपूर (मध्य प्रदेश) हा राष्ट्रीय महामार्ग कामठी शहराच्या मध्यभागातून गेला आहे. शहरात या मार्गाच्या दुभाजकावर ठिकठिकाणी पथदिवे लावले आहेत. मात्र, हे पथदिवे महिनाभरापासून बंद असल्याने त्याचा उपयाेग काय, असा प्रश्न कामठीवासीयांनी उपस्थित केला आहे. रात्रीच्यावेळी हा संपूर्ण महामार्ग अंधारात राहात असल्याने नागरिकांना राेज विविध समस्यांना ताेंड द्यावे लागते.

या राष्ट्रीय महामार्गावर कामठी शहरातील गरूड चौकापासून कमसरी बाजारापर्यंत, तसेच शहरातील मुख्य मार्गावरील जयस्तंभ चौक ते शुक्रवारी बाजार, पोलीस लाईन, मेन रोड, राम मंदिर चौकापर्यंत ठिकठिकाणी पथदिवे लावण्यात आले आहेत. या दाेन्ही मार्गाला दुभाजक असून, त्यावरील पथदिवे महिनाभरापासून बंद आहेत.

सध्या श्रीगणेश उत्सव सुरू असून, यावर्षी शहरात ५३ सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. काेराेना संक्रमण कमी झाल्याने आधीच राेडवरील वर्दळ वाढली हाेती. त्यातच शहरातील बहुतांश नागरिक रात्रीच्या वेळी कुटुंबीयांसह गणपतींचे दर्शन घेण्यासाठी जातात. त्यामुळे राेडवरील गर्दीत वाढ झाली आहे. गुन्हेगार व चाेरटे अंधाराचा फायदा घेत महिलांच्या अंगावरील व बॅगेतील दागिने चाेरून नेण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे संभाव्य संकट टाळण्यासाठी स्थानिक नगरपालिका प्रशासनाने शहरातील बंद असलेले सर्व पथदिवे तातडीने सुरू करावे, अशी मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे.

...

डाेळे दिपणारा प्रकाश

हा राष्ट्रीय महामार्ग २४ तास वर्दळीचा आहे. यावरून धावणारी बहुतांश वाहने भरधाव असतात. वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशझाेतामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांचे डाेळे दिपतात. अशावेळी वाहनावरील ताबा सुटून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामठी शहर गुन्हेगारीमध्ये आधीच संवेदनशील आहे. अंधारामुळे शहरात गुन्हेगार व असामाजिक तत्त्वांचा वावरही वाढला आहे.