शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदवीच्या अंधारलेल्या भविष्याला हवी आधाराची पणती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST

आर्थिक चणचणीपोटी प्रवेश अडचणीत : वडिलांची मुलीच्या प्रवेशासाठी धडपड नागपूर : ९७ टक्के गुणांसह दहावीत उत्तीर्ण झालेल्या हिंदवी ...

आर्थिक चणचणीपोटी प्रवेश अडचणीत : वडिलांची मुलीच्या प्रवेशासाठी धडपड

नागपूर : ९७ टक्के गुणांसह दहावीत उत्तीर्ण झालेल्या हिंदवी राजेश विसपुते या विद्यार्थिनीला भविष्यात इंजिनिअर बनायचे आहे. पण आज तिच्या घरची आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक आहे की तिच्याकडे कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीसुद्धा पैसे नाहीत. वडिलांची मुलीच्या प्रवेशासाठी धडपड सुरू आहे, पण मदतीचे दार बंद झाल्याने ते हतबल झाले आहेत.

हिंदवीचे वडील राजेश विसपुते हे आंगठी बनविण्याचे कारागीर आहेत. नोटबंदीनंतर त्यांच्या व्यवसायावर अवकळा आली. त्यातच हॉलमार्किंग आल्याने आता कामच मिळत नसल्याने त्यांना घराचा गुजाराही करणे कठीण झाला आहे. हिंदवीची आई निकिता गृहिणी असून, त्याही लहानसा गृहउद्योग करून कुटुंबाचे दोन वेळेचे पोट भरेल यासाठी हातभार लावतात. घरात ६ लोकांचे कुटुंब, हाताला रोजगार नाही अशात मुलगी हुशार पण तिला शिकवायलाच पैसा नसल्याने नवरा-बायको दोघांच्याही चेहऱ्यावर निराशेची लकेर आहे.

काही संस्था व व्हाॅट्सअ‍ॅपवर व्हायरल होणारे काही नंबर जे शालेय विद्यार्थ्यांना मदत करतात, त्यांनाही संपर्क साधण्याचा राजेश विसपुते यांनी प्रयत्न केला. पण ते सर्व बोगस निघाले. कुठून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नातेवाईक, मित्र यांच्याकडेही हात पसरले पण कोरोनाच्या काळात त्यांचीही परिस्थिती बेताची असल्याने त्यांनीही नकार दिला. मुलीच्या भविष्याच्या मार्गात अंधारच दिसत असल्याने ते हतबल झाले आहे.

- हिंदवीला हवाय मदतीचा हात

मुलगी हुशार आहे. तिच्या शिक्षणासाठी मदत व्हावी, अशी तिच्या वडिलांची अपेक्षा आहे. गुणवंत मुलीचे पैशासाठी शिक्षण थांबू नये, यासाठी समाजातून मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे. तिच्या अंधारलेल्या भविष्याला आधाराची पणती होण्यासाठी ९०६७०४७५३८ अथवा ९८२२६९०३६६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. अन्यथा निकिता राजेश विसपुते यांच्या बँक ऑफ इंडियाच्या सीताबर्डी शाखेतील ८७६६१०११००१४९०३ या खात्यावर मदत करू शकता.