शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

लग्न आले दारी, पैसा नाही घरी!

By admin | Updated: November 11, 2016 03:14 IST

लग्न आले दारी, पैसा नाही घरी, अशी अवस्था शास्त्रीनगरातील एका वडिलांची झाली आहे.

वधूचे वडील हतबल : नोटा रद्द झाल्याने लग्नकार्य अडचणीतनागपूर : लग्न आले दारी, पैसा नाही घरी, अशी अवस्था शास्त्रीनगरातील एका वडिलांची झाली आहे. शुक्रवारी मुलीचे लग्न आहे. घरात पैसा असून ही त्याचा उपयोग होत नसल्याने, एका नियोजित वधूचे वडील हतबल झाले आहेत. मुलीच्या लग्नाच्या तोंडावर सरकारने हजार, पाचशेच्या नोटा बंद केल्याने, हा लग्न सोहळा कसा पूर्ण करावा, अशी चिंता त्यांना सतावत आहे. भाऊराव काळे असे त्यांचे नाव असून, त्यांची मुलगी दिव्या हिचा शुक्रवारी लग्नसोहळा आहे. गुरुवारी तिला हळद लागली. परंतु वडील लग्नकार्य सुरळीत पडेल की नाही, या चिंतेत दिसले. लग्नसोहळा म्हटले की, छोट्याछोट्या गोष्टीला पैशांची गरज असते. सभागृह, मंडप डेकोरेशन, कॅटरर्स यांना चेक देऊन थांबविले आहे. परंतु दूध, दही, किराणा, भाजीपाला, ट्रान्सपोर्ट, बँण्डपथक, या गोष्टी तर पैशाशिवाय शक्यच नाही. ५०० आणि १००० च्या नोटा चालत नाही. जो-तो १०० च्या नोटेची मागणी करतो आहे. ट्रान्सपोर्टवाले तर चांगलीच अडवणूक करीत आहेत. एवढा मोठा चिल्लर पैसा आणावा कुठून, असा प्रश्न काळे व्यक्त करीत आहेत. आज बँकेत पैसे मिळायला लागले. परंतु आता वेळ राहिलेला नाही. अनेकांकडे केली पैशांची मागणीघरातील पैसा काही उपयोगाचा नाही. बाजारात १०० च्या नोटा उपलब्ध नाही. बँका बंद, एटीएम बंद, पैसे कुठूनही उपलब्ध होत नसल्यामुळे, नातेवाईक, मित्रांना घरात आहे, तेवढे १०० ची नोट, चिल्लर आणण्यास सांगितले आहे. दोन पैसे कमी घेऊन बाजारातही कुणी पैसे उपलब्ध करून द्यायला तयार नाही. लग्नाच्या तोंडावर हे विघ्न, खूप मनस्ताप देत आहे. भाऊराव काळेरंगारी कुटुंबीयांपुढेही पेच नागपूर : ५०० आणि १००० रुपयाचे चलन बंद करण्यात आल्याने सध्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सर्वाधिक अडचण लग्न समारंभ असलेल्या कुटुंबीयांची होत आहे. आठ दिवसावर लग्न आले आहे आणि खर्च करण्यासाठी हातात केवळ दहा हजार रुपये शिल्लक आहे, अशा अडचणीत रंगारी कुटुंबीय सापडले आहे. कितीही साधेपणाने लग्न लावतो म्हटले तरी सोने वगळता किमान अडीच ते तीन लाख रुपयाचा खर्च येतो. उत्तर नागपुरातील मायानगर येथे राहणाऱ्या रंगारी कुटुंबातील ममता हिचे लग्न येत्या १८ तारखेला वर्धा रोडवरील डॉ. आंबेडकर सभागृहात होणार आहे. घरी आई, आजी आणि दोन भाऊ आहे. बहिणीचे लग्न असल्याने लग्नात कुठलीही कमतरता राहू नये, याची भावांकडून काळजी घेतली जात आहे. आठवडाभरापूर्वीच बँकेतून ५० हजार रुपये काढले. हॉलचा खर्च देऊन झाला. कपडे, कॅटरिंग, व इतर खर्च शिल्लक आहे. अचानक ५०० व १००० रुपयाची नोट बंद झाली. पैसे आहेत पण आता ते घ्यायला कुणी तयार नाही. बँकेतूनही आठवडाभरात २० हजाराच्या वर काढता येणार नाही. लग्नाचे जेवण, हळदीचा कार्यक्रम, मंडप, गाडी आदींसह इतर लहानसहान खर्च भागवणे शक्य नाही. त्यामुळे रंगारी कुटुंबापुढे मोठा बिकट प्रसंग ओढवला आहे. बँकेत पैसे असूनही मार्ग काढण्यासाठी नातेवाईक आणि मित्र मंडळीकडून उसनवारीवर पैसे घेण्याची वेळ आली आहे.