शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

मॉडेल मिल चाळ धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 02:03 IST

गणेशपेठ येथील मॉडेल मिल चाळीची इमारत जीर्ण झाली आहे. कोणत्याही क्षणी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देभिंत पडल्याने वडील व मुलगी जखमी : जीर्ण चाळ रिकामी करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ येथील मॉडेल मिल चाळीची इमारत जीर्ण झाली आहे. कोणत्याही क्षणी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. असे असूनही २९४ कुटुंब येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी चाळीची दोन नंबरची भिंत लगतच्या घरावर पडली. यामुळे टिनाच्या शेड असलेल्या घरात वास्तव्यास असलेले आॅटोचालक शेख भुरू (४३) व त्यांची मुलगी सानिया (११) गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शेख भुरू व त्यांची मुलगी सानिया जेवण करीत असतानाच ही दुर्घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. नगरसेवक हर्षला साबळे यांनी घटनेची प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर धंतोली झोन व अतिक्रमणविरोधी पथकाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी चाळीतील रहिवाशांना दुसरीकडे वास्तव्यास जाण्याचे निर्देश दिले.इमारतीचा जीर्ण भाग पाडण्याला पथकाने सुरुवात करताच काही महिलांनी याला विरोध दर्शविला. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाºयांनी दुपारी ४ वाजता लाऊ डस्पीकर फिरवून चाळ खाली करण्याची दवंडी दिली. पावसाळ्याच्या दिवसात जीर्ण इमारत पडण्याचा धोका असल्याने रहिवाशांनी अन्यत्र वास्तव्यास जाण्याचे आवाहन अधिकाºयांनी केले. तसेच परिसरात २४ तासात चाळ खाली करण्यासंदर्भात नोटीस लावण्यात आल्या आहेत. या कालावधीत चाळ खाली न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.पथकाने खाली इमारतीचा जीर्ण झालेला वरचा भाग व भिंत पाडली. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील , झोन अधिकारी नरेंद्र भंडारकर, जमशेट अली व पोलीस पथकाने केली.बिल्डर व चाळधारकांत वाद१९९४ साली मॉडेल मिल चाळीत ३०२ कुटुंब वास्तव्यास होते. परंतु ही इमारत जीर्ण झाल्याने रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली होती. राज्य सरकारकडून मुंबईच्या पीअ‍ॅन्डपी असोसिएटने ही जमीन खरेदी केली. परंतु चाळधारक इमारत रिकामी करायला तयार नाही. अखेर बिल्डर व चाळधारकात झालेल्या करारानुसार इमारतीच्या पहिल्या माळ्यावर येथील रहिवाशांना २२५ चौ.फुटाचे फ्लॅट देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने प्रत्येकाला २७५ चौ.फुटाचे फ्लॅट देण्याची घोषणा केली. सरकारच्या घोषनेनुसार फ्लॅट देण्याची गाळेधारकांची मागणी आहे. मात्र बिल्डरचा याला विरोध आहे.