शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाचा नागपूर विद्यापीठाला दणका

By admin | Updated: May 14, 2015 02:42 IST

वित्त व लेखाधिकारी डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या पुनर्नियुक्तीच्या प्रकरणात हायकोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशाविरुद्ध

नागपूर : वित्त व लेखाधिकारी डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांच्या पुनर्नियुक्तीच्या प्रकरणात हायकोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशाविरुद्ध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय विक्रमजित सेन व अभय सप्रे यांनी बुधवारी ही याचिका फेटाळून विद्यापीठाला दणका दिला. व्यवस्थापन परिषदेने पुनर्नियुक्तीचा निर्णय घेतला असतानाही मेश्राम यांना निवड प्रक्रियेतून जाण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. ६ डिसेंबर २०१४ रोजी वित्त व लेखाधिकारीपदाची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती. याविरुद्ध मेश्राम यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका सादर केली. गेल्या १३ मार्च रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व चंद्रकांत भडंग यांनी ही याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करुन घेतली. तसेच, याचिका प्रलंबित असेपर्यंत मेश्राम यांना पदावर कायम ठेवण्याचे आणि त्यांना या पदाचे सर्व लाभ देण्याचे अंतरिम आदेश दिलेत. या आदेशाला विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.व्यवस्थापन परिषदेने शासनाचे मत विचारात घेतल्यानंतर ७ जुलै २०१४ रोजीच्या बैठकीत मेश्राम यांना पुनर्नियुक्ती देण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव पारित केला. यानंतर तत्कालीन प्रभारी कुलगुरुंनी कुलपतींना पत्र लिहून मेश्राम यांच्यावर विविध आरोप केले होते. त्यावरून मेश्राम यांना निवड प्रक्रियेतून जाण्याचा वादग्रस्त आदेश जारी करण्यात आला होता. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. पी. एस. पटवालिया, तर प्रतिवादींतर्फे अ‍ॅड. इंदू मल्होत्रा व अ‍ॅड. प्रशांत डहाट यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)