शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनांपेक्षा स्वस्त दरात डाळ वाटा

By admin | Updated: October 22, 2016 02:37 IST

गेल्या दोन वर्षापासून डाळींच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ऐन सणासुदीच्या काळात परत भाववाढ वाढ होत आहे.

डाळींवरून देशमुखांचा बापटांवर नेम : भाव नियंत्रित ठेवण्यात अपयशीनागपूर : गेल्या दोन वर्षापासून डाळींच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ऐन सणासुदीच्या काळात परत भाववाढ वाढ होत आहे. यामुळे या काळात सामान्य नागरिकांच्या ताटातून डाळ हद्दपार होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी मंत्री गिरीश बापट हे जबाबदार आहेत, अशी टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांवर माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी नेम साधल्यामुळे ऐन दिवाळीत पुन्हा एकदा डाळीला तडका मिळण्याची शक्यता आहे. देशमुख यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दिवाळीत ग्राहकांना माफक दरात डाळी उपलब्ध झाल्या नाही तर आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री असतानाही डाळींच्या किमती वाढल्या होत्या. यावर तोडगा काढत केंद्र सरकारकडुन व इतर राज्यातुन जवळपास ५० हजार मेट्रिक टन डाळ आयात करुन ती राज्यभरातील रेशन दुकानाच्या माध्यमातुन उपलब्ध करून दिली होती. सवलतीच्या दरात डाळ ही योजना यशस्वीपणे राबविली होती. शिवाय याच काळात गरिबांना दिवाळीत पाम तेल हे ४५ रुपये किलो प्रमाणे दिले होते, याची आठवण देशमुख यांनी बापट यांना करून दिली आहे. सणासुदीचा काळ असताना बापट यांनी फक्त ७०० मेट्रिक टन डाळीची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्यात डाळींची मागणी यापेक्षाही मोठी आहे. मात्र ही मागणी पूर्ण करण्यासाठी तसेच भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बापट हे कोणतेही ठोस प्रयत्न करताना दिसत नाही. आश्वासनाची खैरात वाटण्यापेक्षा रेशन दुकानातून स्वस्त दरात तूर डाळ वाटण्याचे काम त्यांनी करावे अशी खोचक टीकाही देशमुख यांनी केली आहे. राज्यात जवळपास १ कोटी ७७ लाख हे एपीएल म्हणजेच केशरी कार्ड धारक आहेत. आपण या खात्याचा मंत्री असतांना या कार्डधारकांना १० किलो गहू व ५ किलो तांदूळ असे १५ किलो धान्य हे सवलतीच्या दरात देण्यात येत होते. परंतु बापट मंत्री होताच केशरी कार्ड धारकांना मिळणारे सवलतीच्या दारातील हे धान्य देणे बंद करण्यात आले. यामुळे राज्यातील १ कोटी ७७ लाख कुटुंबाच्या तोंडचा घास हिरावला आहे. हेच सामान्य नागरिकांचे अच्छे दिन का, असा टोलाही देशमुख यांनी बापट यांना लगावला आहे.(प्रतिनिधी)